Editor Choice

Mumbai : ‘मेगा कोविड’ सेंटरमध्ये हजारो कोटींचा महाघोटाळा … या नेत्याने केले गंभीर आरोप!

महाराष्ट्र 14 न्यूज : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर राज्यात उभारण्यात आलेल्या मेगा कोविड सेंटरमध्ये एक दोन नव्हे, तर तब्बल एक हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा झाल्याचा गंभीर आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. यासंदर्भातील श्वेतपत्रिका काढण्याची मागणी सोमय्या यांनी राज्याच्या मुख्य सचिवांकडे पत्राद्वारे केली आहे.

मेगा कोविड सेंटर उभं करण्याबाबत टेंडर प्रक्रिया कशा रितीनं राबवली, किती रुग्णांनी यामध्ये उपचार घेतले, कोविड सेंटर उभं करण्यासाठी किती खर्च आला या सर्व गोष्टींबाबत अनियमितता आहे, तक्रारी आहेत. हे महाकोविड सेंटर म्हणजे महाघोटाळा असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे.

दरम्यान, याच मुद्द्यावरुन मनसेचीही काही दिवसांपूर्वी आक्रमक भूमिका पाहायला मिळाली होती. कोरोनाच्या संकटकाळात राजकारण होऊ नये, यासाठी महापालिकेतील विरोधी पक्ष गप्प आहेत. मात्र, शिवसेनेकडून याचा फायदा उठवला जात असून महानगरपालिकेत मोठा भ्रष्टाचार सुरु असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून (मनसे) करण्यात आला होता.

ज्याअंतर्गत महापौर किशोरी पेडणेकर यांनी कोविड आणि जम्बो सेंटरचे कंत्राट आपल्या मुलाला मिळवून दिल्याचा आरोप करण्यात आला होता. शिवाय महापौरांनी नैतिक जबाबदारी स्वीकारत आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणीही पक्षाकडून करण्यात आली होती.

Maharashtra14 News

Recent Posts

मोशीत वादळी वाऱ्यासह पाऊसामुळे “या” ठिकाणी ; भलं मोठं लोखंडी होर्डिंग कोसळलं

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.1६ मे ) : पिंपरी चिंचवड शहरातील मोशी, डुडळगाव, चऱ्होली परिसरात सोसाट्याच्या…

3 days ago

चिंचवड ठरविणार मावळच्या विजयाची गणिते, … ४ जूनला कोणती शिवसेनेचा गाठणार दिल्ली? ?

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ मे) : लोकसभेचे मतदान पार पडल्यानंतर आता मावळ विधानसभा मतदारसंघात मताधिक्य…

4 days ago

नवी सांगवीत या शाळेत झाले बोगस मतदान … तर, मोबाईल बंदी मुळे अनेक मतदार गेले माघारी … पोलिस आणि मतदारांमध्ये हुज्जत

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. १३) मतदान झाले. सकाळी…

5 days ago

भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी मानले मावळ आणि शिरूर च्या मतदारांचे आभार, असे झाली मतदानाची टक्केवारी:

महाराष्ट्र 24 न्यूज, (दि.१३ मे) : आज (दि.१३ मे) पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर आणि पुणे…

6 days ago

नवी सांगवीत मतदानाला शांततेत सुरवात; बा रा घोलप महाविद्यालयात सकाळपासूनच मतदान केंद्रांवर रांगा, कंट्रोल रुमद्वारे प्रशासनाचे लक्ष

wमहाराष्ट्र व14 न्यूज, (दि.१३ मे) : पिंपरी चिंचवड शहरात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी…

6 days ago

अजित पवारांचा निलशे लंके यांना थेट इशारा … अरे, “बेटो तू ज्या शाळेमध्ये शिकतोयस त्या शाळेचा हेडमास्टर अजित पवार आहे”!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगरमध्ये…

1 week ago