Categories: Editor Choice

पिंपरी चिंचवड मधील नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी जनसंवाद सभा प्रभावी माध्यम … या आहेत, नागरिकांच्या तक्रारी

 महाराष्ट्र 14 न्यूज, दि. ६ जून २०२२:-  जनसंवाद सभा ही जनता दरबारासारखी आहे, येथे दाखल केलेल्या तक्रारी  सुचनांवर वेळेत कारवाई झाल्यास जनता समाधानी होते, त्यामुळे जनसंवाद सभेचे काम दूरगामी सकारात्मक परिणाम करणारे आहे, अशी भावना जनसंवाद सभेत सहभागी झालेल्या नागरिकांनी व्यक्त केली.  

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरातील नागरिक आणि प्रशासन यांच्यामध्ये सुसंवाद राखण्यासाठी तसेच तक्रारींचे निवारण जलदगतीने करण्यासाठी महापालिका आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांच्या आदेशानुसार आज महापालिकेच्या सर्व आठही क्षेत्रीय कार्यालयांमध्ये जनसंवाद सभा पार पडली. यामध्ये सुमारे १२७  नागरिकांनी तक्रारी आणि सूचना मांडल्या. यात अ, ब, क, ड, इ, फ, ग आणि ह  क्षेत्रीय कार्यालयामध्ये अनुक्रमे २४, १३ , ७ ,११ , १३ , १४ , २७ , आणि १८  नागरिकांनी जनसंवाद सभेत उपस्थित राहून आपले म्हणणे मांडत भावना व्यक्त केल्या.

          अ, ब, क, ड, ई, फ, ग, ह, या  क्षेत्रीय कार्यालयांच्या जनसंवाद सभेचे अध्यक्षपद मुख्य समन्वय अधिकारी असलेले अनुक्रमे बीआरटीएसचे सह शहर अभियंता श्रीकांत सवणे, शहर अभियंता मकरंद निकम, भूमी आणि जिंदगी विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रशांत जोशी, नागरवस्ती विभागाचे  उप आयुक्त अजय चारठणकर, सह शहर अभियंता सतीश इंगळे, अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, उप आयुक्त चंद्रकांत इंदलकर, पर्यावरण विभागाचे सह शहर अभियंता संजय कुलकर्णी यांनी भूषवले. यावेळी संबधित क्षेत्रीय कार्यालयाचे क्षेत्रीय अधिकारी तसेच क्षेत्रीय कार्यालयांच्या सर्व विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

              यावेळी उपस्थित नागरिकांनी आपल्या भावना व्यक्त करताना, जनसंवाद सभेमध्ये दाखल झालेल्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. ही सभा जनतेच्या आशा आकांशांचे  खऱ्या अर्थाने प्रतिबिंब ठरत आहे. नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी ही सभा प्रभावी माध्यम ठरत आहे.   जनसंवाद सभेचा उपक्रम  स्तुत्य असून तो आधिक प्रभावीपणे राबवा, अशा सूचना देखील नागरिकांनी यावेळी केल्या. मिळकतकर भरण्याबाबत प्रशासकीय यंत्रणा अधिक गतिमान होण्याची आवश्यकता आहे. तेथील मूल्यनिर्धारणाच्या फाईल्सचा निपटारा तातडीने करण्यात यावा यासह नागरिकांच्या वतीने आज झालेल्या जनसंवाद सभेमध्ये विविध तक्रारी आणि सूचना मांडण्यात आल्या. शालेय विद्यार्थांच्या सुरक्षेसाठी ज्या शाळांच्या जवळ फुटपाथ आहेत तेथे रस्ता आणि फुटपाथ यांच्यामध्ये संरक्षक ग्रील/ जाळी बसवावी,  नैसर्गिक नाल्या, फुटपाथवर करण्यात आलेले अतिक्रमण काढावे, तसेच नाले बुजवून अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाई करावी.

 नागरिकांना मोकाट कुत्र्यांचा त्रास होत आहे त्यांचा बंदोबस्त करावा, तसेच पाळीव प्राण्यांबाबत परवाना असणे गरजेचे आहे. याबाबतच्या कोणत्याही नियमावलीचे पालन न करता प्राणी पाळले जातात. त्यांना प्राणी पालनाबाबातच्या नियमावलीचे पालन करण्याच्या सूचना द्याव्यात. स्मार्ट सिटी अंतर्गत बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेरे लवकर सुरु करावेत,  रस्त्याचे डांबरीकरण करावे,  ज्या भागात पाणी साचते तेथील कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावे. दशक्रिया घाटाची दुरुस्ती करावी, रस्त्याच्या दुतर्फा लावण्यात आलेल्या झाडांना पाणी देणे गरजेचे असून रस्ते सुशोभिकरणाकडे लक्ष द्यावे. पुरेशा दाबाने पाणी पुरवठा करावे. फुटपाथ वरील टपऱ्या, बेकायदा पत्राशेड  हटवावे, रस्त्याचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावे, रस्त्याचे सिमेंट कॉंक्रीटीकरण करावे, उद्यानाचे अर्धवट काम पूर्ण करावे, रस्त्यावरील राडारोडा हटवावे, रस्त्यावरील चेंबरची दुरुस्ती करावी, शहरात विद्यार्थांसाठी  अभ्यासिका उभाराव्यात, स्वच्छतेसाठी सफाई कर्मचारी नियमित पाठवावे अशा सूचना जनसंवाद सभेत नागरिकांनी मांडल्या.

            तत्पूर्वी मागील जनसंवाद सभेमध्ये आलेल्या तक्रारींवर करण्यात  आलेल्याकार्यवाही बद्दल आढावा घेण्यात आला.

Maharashtra14 News

Recent Posts

रोहित पवारांचा अजित पवारांवर निशाणा … अजित दादा तुमच्यात जर धाडस असेल तर ….

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०४ मे) : बारामती लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या…

7 hours ago

तुमच्या इथे कोणाविरुद्ध कोण? जाणून घ्या, … पहा, महाराष्ट्रातील सर्व 48 मतदारसंघातील उमेदवारांची यादी!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ मे) : महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 47 जागांवरील लढती कशा असतील हे…

3 days ago

अंध दिव्यांग नागरिकांना ब्रेल लिपीतील व्होटर स्लिपचे वाटप

महाराष्ट्र14 न्यूज, (दि.०२ मे) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मा.निवडणूक…

3 days ago

दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप व आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ मे) : दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप…

4 days ago

‘जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली, तर पुन्हा माझ्याकडे पायरी चढायची नाही … नेत्याने दिला कार्यकर्त्याना दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…

7 days ago