महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.३० नोव्हेंबर) : सध्या मराठी चित्रपटसृष्टीत लग्नसराई सुरू आहे. नुकताच एका मराठमोळ्या अभिनेत्रीचा साखरपुडा देखीर पार पडला आहे.
अभिनेत्री अमृता बने आणि अभिनेता शुभंकर एकबोटे यांचा साखरपुडा पार पडला आहे.
त्यांचे साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.अमृता बने आणि शुभंकर एकबोटे यांनी त्यांच्या साखरपुड्यासाठी खास लूक केला होता.कन्यादान’ या मालिकेत अमृता बने आणि शुभंकर एकबोटे यांनी काम केलं होतं.
सोशल मीडियावर अनेक जण
अमृता बने आणि शुभंकर एकबोटे यांना शुभेच्छा देत आहेत.अमृता बनेनं सातव्या मुलीची सातवी मुलगी, कन्यादान, रंग माझा वेगळा आणि वैजू नंबर 1 या मालिकांमध्ये काम केलं आहे.