Editor Choice

Delhi : उद्या १ सप्टेंबर पासून होणार हे महत्त्वाचे बदल … तुमच्या खिश्यावर होणार परिणाम!

महाराष्ट्र 14 न्यूज : 1 सप्टेंबर 2020 पासून 9 मोठे बदल होणार असून, याचा परिणाम तुमच्या आयुष्यावर पडेल. यातील काही नवीन नियमांमुळे तुम्हाला दिलासा मिळेल, तर काही नियमांकडे दुर्लक्ष केल्याने तुमचे आर्थिक नुकसान देखील होऊ शकते. यामध्ये घरगुती सिलेंडरचे भाव, जीएसटी शुल्क, जमिनीवरील स्टँप ड्यूटी शुल्क इत्यादी नियमांचा समावेश आहे. याविषयी जाणून घेऊया.

घरगुती गॅस सिलेंडरचे भाव –

दर महिन्याला गॅस सिलेंडर्सच्या किंमतीबाबत समिक्षा होत असते. प्रत्येक राज्यात कर वेगवेगळा असल्याने किंमत देखील वेगळी असते. ऑगस्टमध्ये मुंबईत 14.2 बिगर-सबसीडी गॅसची किंमत 610.50 रुपये होती. तर 19 किलो सिलेंडरची किंमत 1091 रुपये होती.

तर दिल्लीत 14.2 किलो सिलेंडरची किंमत 594 रुपये आणि 19 किलो सिलेंडरची किंमत 1135.50 रुपये होती. सप्टेंबरमध्ये या दरात बदल होतील.

कर्ज मोरेटोरियमची सुविधा समाप्त –

आरबीआयने लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये कर्जाचे हप्ते न भरण्यास मुदतवाढ दिली होती. हा कालावधी 31 सप्टेंबरला समाप्त होणार आहे. आरबीआयने कर्जदारांसाठी लोन रिस्ट्रक्चरिंग स्कीम देखील आणली आहे.

जीएसटी भरण्यास विलंब झाल्यास व्याज –

जीएसटी भरण्यास विलंब झाल्यास 1 सप्टेंबरपासून व्याज लागेल. या वर्षीच्या सुरुवातीला जीएसटी भरण्यास विलंब झाल्याने 46000 कोटी रुपयांच्या थकबाकी व्याजाच्या वसूलीबाबत चिंता व्यक्त करण्यात आली होती.

हवाई प्रवास महागणार –

1 सप्टेंबरपासून विमान प्रवास महागणार आहे. नागरी उड्डाण मंत्रालयाने प्रवाशांकडून उच्च उड्डाण सुरक्षा शुल्क घेण्याचा निर्णय घेतला आहे. स्थानिक प्रवाशांकडून 150 रुपयांच्या ऐवजी 160 रुपये घेतले जातील. तर आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी 4.85 डॉलर्सच्या ऐवजी 5.2 डॉलर्स घेतले जातील.

किसान क्रेडिट कार्डधारकांना द्यावे लागेल व्याज –

देशातील 8 कोटी किसान क्रेडिट कार्डधारकांना बँकेकडून घेतलेले कर्ज 31 ऑगस्टपर्यंत परत करावे लागेल. कर्ज परत न केल्यास त्यांना 7 टक्के दराने व्याज द्यावे लागेल. शेतकऱ्यांसाठी असे व्याज दर 9 टक्के आहे. मात्र सरकार यात 2 टक्के सबसीडी देते.

एचडीएफसी क्रेडिट कार्डचे उशीरा पेमेंट करणे महागात –

जर तुमच्याकडे एचडीएफसीचे क्रेडिट कार्ड असल्यास तुम्हाला 1 सप्टेंबरनंतर उशीरा पेमेंट केल्यास लेट पेमेंट चार्ज अधिक भरावा लागणार आहे. इंफिनिया कार्डसोडून सर्व कार्डांवर नवीन शुल्क लावले आहे. 50 हजारांपेक्षाच्या अधिकच्या रक्कमेवर 950 रुपयांच्या ऐवजी 1300 रुपये शुल्क भरावे लागेल.

अनलॉक -4 –

गृह मंत्रालयाने अनलॉक-4 चे मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. हे नवीन नियम 30 सप्टेंबरपर्यंत लागू राहतील. मेट्रो रेल, ओपन एअर थेएटर आणि स्टाफसाठी शाळा उघडण्याची काही अटींसह परवानगी दिली आहे. याच्याशिवाय अन्य काही महत्त्वाची मार्गदर्शक तत्वे देखील आहेत.

इंडिगो सुरू करणार उड्डाण –

एअरलाईन्स इंडिगो आपली विमानसेवा टप्प्याटप्प्याने सुरू करणार आहे. 1 सप्टेंबरपासून प्रयागराज, कोलकत्ता ते सुरत मार्गावर सेवा सुरू होईल. सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी ही सेवा सुरू असेल.

जमिनी खरेदीवर स्टँप ड्यूटी कमी –

जमीन-घराच्या खरेदी विक्रीला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मुद्रांक शुल्क (स्टॅम्प ड्युटी) 3 टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.

Maharashtra14 News

Recent Posts

पुणे व पिंपरी-चिंचवड शहर झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी … झोपडपट्टी पुनर्वसनासाठी ५० नवीन प्रस्ताव दाखल

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२३ मे) : झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या सुधारीत नियमावलीतील तरतुदींमुळे झोपडपट्टी पुनर्वसन योजनेला…

4 days ago

मतमोजणी केंद्राच्या १०० मीटर परिसरात मनाई आदेश लागू, तर जिल्ह्या याठिकाणी होणार मतमोजणी

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२३ मे) : जिल्ह्यातील लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय…

4 days ago

आता नागरिकांच्या तक्रारींचा जागेवरच होणार निपटारा … पोलिस आयुक्तांचे आदेश

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२० मे) : नागरिकांशी थेट संवाद साधता यावा, तक्रारदारांची गैरसोय होऊ नये…

6 days ago

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने ५ अनधिकृत जाहिरात फलकांवर निष्कासनाची कारवाई

महाराष्ट्र 24 न्यूज, दि. २० मे २०२४ - पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने शहरातील अनधिकृत जाहिरात…

7 days ago

उद्या दुपारी एक वाजता बारावीचा निकाल जाहीर होणार, विध्यार्थ्यांना आणि पालकांना निकालाची उत्सुकता

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२० मे) : महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक मंडळाच्यावतीनं (MSBSHSE) बारावीच्या परीक्षेच्या निकालाची…

7 days ago