Google Ad
Uncategorized

पिंपरी चिंचवड महापालिकेत … ‘शासन आपल्या दारी, जत्रा शासकीय योजनांची,सर्वसामान्यांच्या विकासाची’ … या अभियानाची सुरुवात

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१जून) : शासकीय योजना लोकाभिमुख करून त्याची अंमलबजावणी गतिमान करण्यासाठी “शासन आपल्या दारी, जत्रा शासकीय योजनांची, सर्वसामान्यांच्या विकासाची” या अभियानाची सुरुवात  महापालिकेत  करण्यात आली.

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक, पिंपरी येथे महानगरपालिकेच्या समाज विकास विभाग अंतर्गत विविध कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून महिला बालकल्याण विभाग या योजनेअंतर्गत १६४ विधवा महिलांना र.रु.१५०००/- व मागासवर्गीय कल्याणकारी योजनेअंतर्गत मुलींसाठी सायकल या योजनेअंतर्गत १०० मुलींना र.रु ७०००/- रक्कमेचा ऑनलाईन लाभ अतिरिक्त आयुक्त  प्रदीप जांभळे पाटील आणि उप आयुक्त  अजय चारठाणकर  यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. तसेच २३९ लाभार्थी यांच्या अर्जातील त्रुटींची पूर्तता करून त्यांचे  अर्ज पात्र करण्यात आले व १३ नवीन अर्ज भरण्यात आले आहेत.

Google Ad

या कार्यक्रमास प्रशासन अधिकारी सविता आगरकर, समाजसेविका संतोषी चोरघे, लिपिक रोहित साळवी, प्रज्ञा कांबळे,महेंद्र गायकवाड, जयेश खताळ,अनिकेत सातपुते,कल्पना मदगे,मनीषा भुजबळ आदी कर्मचारी उपस्थित होते.

लाभार्थ्यांना अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी मार्गदर्शन केले, कार्यक्रमाचे प्रास्ताविक समाज विकास  विभागाचे उपायुक्त अजय चारठाणकर यांनी केले, सूत्रसंचालन समूह संघटक वैशाली खरात यांनी तर आभार समूह संघटक रेश्मा पाटील यांनी मानले.

Ad3
ad2
ad1
Google Ad

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!