महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.११ मार्च) : 11 मार्च शनिवारी रोजी जुनी सांगवी येथे खान्देश मित्र मंडळाचा तेरावा वर्धापन दिवस कौटुंबिक स्नेहमेळाव्याने साजरी करण्यात आला.सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले.तसेच तसेच आपल्या परिसराचे भाग्यविधाते दिवंगत आमदार लक्ष्मण भाऊ जगताप यांना आणि वर्षभरात ज्ञात अज्ञात स्वर्गवासी झालेल्या मृतआत्म्यांना श्रद्धांजली अर्पित करण्यात आली.आणि गणेश वंदनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. शहराच्या नवनिर्वाचित पहिल्या महिला आमदार श्रीमती अश्विनीताई लक्ष्मण जगताप यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माननीय कृष्णकुमार पाटील साहेब संचालक बालभारती पुणे, शहराच्या माजी महापौर माई ढोरे,कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान श्री. दिलीप तनपुरे सर यांनी भूषवले, जेष्ठ उद्योजक माननीय विजयशेठ जगताप, मां.नगरसेवक शंकर जगताप, मा.नगरसेविका सौ शारदाताई सोनवणे मा. नगरसेवक शशिकांत आप्पा कदम नगरसेवक हर्षल ढोरे मा. नगरसेवक अतुल शितोळे, स्वीकृत नगरसेवक शिवाजी पाडूळे, सामाजिक कार्यकर्ते श्री. बाळासाहेब देवकर, राज सोमवंशी, संतोष ढोरे सामाजिक कार्यकर्ते कृष्णा भंडलकर , ललित म्हसेकर, मधुबन मित्र मंडळाचे अध्यक्ष गणेश ढोरे, विलास तात्या जगताप नवचैतन्य हास्य परिवाराचे साबळे साहेब,रमेश काशीद,राजेंद्र पाटील,भागवत झोपे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळाचे अध्यक्ष प्रा. उमेश बोरसे यांनी केले या त्यांनी मंडळाच्या तेरा वर्षात केलेल्या कामाचा आलेख सर्वांसमोर मांडला आणि मंडळाचे भविष्यातील उद्देश आपल्या परिसरामध्ये विद्यार्थी, महिला, कामगार,जेष्ठ नागरिक यांच्यासाठी मंडळाने राबवलेल्या योजना यांच्या बद्दल माहिती दिली. तसेच गेल्या अनेक वर्षापासून भाऊंचा खानदेशवाशीयांशी असलेला स्नेह आणि प्रेम, जिव्हाळा आणि भाऊंनी खान्देश मित्र मंडळावर दाखवलेला विश्वास मंडळ सार्थ करत असताना आज भाऊ या कार्यक्रमात नसल्यामुळे सर्व वातावरण भाऊक झाले होते. परंतु भाऊंच्या पाठीमागे पाठीमागे अशविनिताई ति उणीव भासू देणार नाहीत. अशी आशा व्यक्त केली.तसेच या प्रसंगी खान्देश महिला मंडळाची स्थापना झाल्याचे घोषित करण्यात आले. जेणेकरून महिलांना स्वतंत्र व्यासपीठ उपलब्ध होऊन त्यांना त्यांच्या कलागुणांना त्यांच्या व्यवसायाला,रोजगाराला वाव कसा देता येईल त्यासाठी या मंडळाची स्थापना करण्यात आली. त्या माध्यमातून महिला भगिनी भविष्यामध्ये वेगवेगळे कार्यक्रम राबवणार आहेत अशी माहिती दिली. याप्रसंगी आमदार यांनी भाऊंना खानदेशवासीयांबद्दल असलेले प्रेम आणि जीव्हाळ्याचा उल्लेख केला आणि या सर्व खान्देशवाशी यांनी भाऊंनवर जो विश्वास टाकला आणि जे प्रेम दिले त्यात मी कुठेही कमी पडू देणार नाही माझ्यासोबत मा.शंकरशेठ, मा. विजुसेठ आणि सर्व परिसरातील नगरसेवक,नगरसेविका कार्यकर्ते सदोदित तुमच्या पाठीमागे असतील असा विश्वास दिला.
मान्यवरांच्या हस्ते दहावी आणि बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला तसेच काही ज्येष्ठ जोडप्यांचा देखील यथोचित सत्कार करण्यात आला, मुलांच्या कलागुणांना वाव म्हणून काही संस्कृत कार्यक्रमांचे आयोजन केले गेले, चिंचवड शहरातील प्रसिद्ध मलाबार डायमंड यांच्याकडून महिला भगिनींसाठी खास लकी ड्रॉ ठेवण्यात आला त्यातून तीन महिलांना बक्षीस देण्यात आले. याप्रसंगी मंडळाचे सचिव श्री मनोहर पवार सर यांची दि. गव्हर्मेंट सर्व्हटस महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी ली.पुणे च्या संचालक पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर सुग्रास भोजनाचा सर्वांनी आनंद घेत नितीन कदम प्रस्तुत सुमधुर गाण्यांचा आनंद घेत अनेकांनी त्याच्यावर ठेका धरला…
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. विजय पाटील सर, श्री पवार सर यांनी केले.
आभार प्रदर्शन मनोज ठाकुर यांनी केले, कार्यक्रम यशस्वीतेसाठी मंडळाचे उपाध्यक्ष श्री अरुण अहिरराव, खजिनदार श्री भटू पाटील, संचालक श्री, नितीन पाटील, राजू वानखेडे, जगदीश सोनवणे, लोटन बोरसे, देविदास अहिरराव, अरुण पाटील,श्री.गोपाल पाटील आणि मंडळाच्या अनेक सदस्यांनी परिश्रम घेतले..
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०६ जानेवारी : महानगरपालिकेतील अधिकारी आणि कर्मचा-यांचे मुले-मुली शिक्षण,कला,संशोधन,क्रीडा यासारख्या विविध क्षेत्रात…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०४ जानेवारी : पिंपळे गुरव परिसरात सामाजिक क्षेत्रात अग्रगण्य असणाऱ्या व जनसामान्यांच्या…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०३ जानेवारी : पुणे येथील औंध जिल्हा रुग्णालय येथे आयोजित दौऱ्यात महाराष्ट्राचे…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२७ डिसेंबर : सद्गुरु श्री जोग महाराज साधक प्रतिष्ठान पिं.चिं. शहर यांच्या…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२७ डिसेंबर : पिंपरी-चिंचवड हे महाराष्ट्रातील वेगाने विकसित होणारे शहर असून, येथील…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. 25 डिसेेंबर, 2024 : महाराष्ट्राच्या 58व्या वार्षिक निरंकारी संत समागमाचे भव्य…