Google Ad
Uncategorized

पिंपरी चिंचवड शहरातील राडारोडा गोळा करून त्यावर सीएनडी वेस्ट प्रकल्पात होणार प्रक्रिया

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२ सप्टेंबर २०२३;- पिंपरी-चिंचवड शहर स्वच्छ व सुंदर करण्यासाठी महापालिकेकडून आयुक्त शेखर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपाययोजना करण्यात येत असून, त्या अनुषंगाने योजनेचा एक भाग म्हणून शहरातील राडारोडा गोळा करून सीएनडी वेस्ट प्रकल्पांतर्गत पाठविण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्यात यावी असे निर्देश अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी संबंधित विभागांना दिले.

महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त खोराटे यांनी आज सकाळी मोशी कचरा डेपो व परिसरास भेट देऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेतला. मोशी कचरा डेपो, मेकॅनिकल कंपोस्टिंग सीएनडी वेस्ट,बायोगॅस प्लॅन्ट, बायोमेडिकल प्लॅन्ट या सर्व ठिकाणी त्यांनी भेटी देऊन परिस्धितीची पाहणी केली आणि अर्धवट राहिलेले प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी संबंधितांना निर्देशही दिले .

Google Ad

या पाहणी दरम्यान त्यांच्यासोबत सह शहर अभियंता संजय कुलकर्णी, आरोग्य कार्यकारी अधिकारी गणेश देशपांडे, आरोग्य निरीक्षक सुशील मलये त्याचप्रमाणे अंतोनी लारा आणि सीएनडी वेस्ट प्रकल्पांचे अधिकारी उपस्थित होते.पर्यावरण विभागाचे प्रमुख संजय कुलकर्णी यांनी मोशी कचरा डेपो तसेच विविध प्रकल्पांची माहीती अतिरिक्त आयुक्त खोराटे यांना दिली.

यावेळी शहरातील राडारोडा गोळा करून त्यावर सीएनडी वेस्ट प्रकल्पात त्वरित प्रक्रिया करावी, मेकॅनिकल कंपोस्टींग प्रकल्प, बायोमेडीकल प्रकल्प, बायोगॅस प्रकल्पास गती द्यावी, तसेच नव्याने सुरू होत असलेल्या वेस्ट टु एनर्जी प्रकल्पासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात अशा सूचनाही खोराटे यांनी पर्यावरण विभागास केल्या.

 

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!