Categories: Editor Choice

नवी सांगवीत भटक्या आणि जखमी कुत्र्यांची दहशत … अनेकांचा घेतला चावा

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. २३ ऑगस्ट) : पिंपरी चिंचवड शहरातील नवी सांगवी या भागात भटक्या कुत्र्यांची दहशत दिवसेंदिवस झपाट्याने वाढते आहे. गेल्या एक महिन्यात भटकी कुत्री माणसांना किंवा इतर प्राण्यांना चावा घेतल्याच्या घटना वाढत चाललेल्या आहेत.

जेष्ठ नागरिक, घरकाम करणाऱ्या महिला, विद्यार्थी यांना रस्त्यांवरून ये जा करताना कुत्री अचानक जवळ येऊन चावा घेतात. नवी सांगवीतील समर्थ नगर, न्यू मिलेनियम स्कूल, विनायक नगर (पिंपळे गुरव), स्वामी विवेकानंद नगर, इंद्रप्रस्थ रोड या भागात दररोज अशा चावा घेतल्याच्या घटनामध्ये वाढ होताना दिसत आहे.

सांगवी रुग्णालयाच्या अंतर्गत येणाऱ्या सांगवी, नवी सांगवी, पिंपळे गुरव, कासारवाडी या भागातील वेगवेगळ्या प्राण्यांनी चावा घेतल्याचा जुलै महिन्यात 95 हा आकडा आहे, हा धक्कादायक होत चालला आहे असे, म्हणायला हवे. महानगरपालिका सांगवी रुग्णालयाअंतर्गत मे मध्ये 102, जून 98 तर जुलै 2022 मध्ये 95 यातील जुलै मध्ये 71 कुत्री, मांजर 10 व इतर 14 प्राण्यांनी नागरिकांना चावा घेतला असल्याचे सांगवीच्या इंदिरा गांधी रुग्णालयातून माहिती घेतली असता समजले.

डॉग बाईटसारख्या घटना थांबवण्यासाठी पिंपरी चिंचवड मनपाने प्रयत्न सुरु केल्याची माहिती दिली आहे, परंतु त्यांची यंत्रणा तोकडी पडत असल्याचे दिसून येत आहे. देशात राष्ट्रीय रेबीज नियंत्रण कार्यक्रम सुरु करण्यात आला आहे. नियमांनुसार अशा भटक्या प्राण्यांची लोकसंख्या नियंत्रणात ठेवण्याची जबाबदारी ही स्थानिक प्रशासनाची आहे. याबाबत सरकारने पशु जन्म नियंत्रण नियम केला असून त्यात 2010 साली दुरुस्ती करण्यात आली आहे. मनुष्य आणि पशू यांच्यातील वाद कमी करण्यासाठी सामुदायिक प्राण्यांची दत्तक योजना सुरु करण्यावर भर देण्यात आला आहे , त्यात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने पुढाकार घ्यावा असे नागरिकांचे मत आहे.

महानगरपालिका पशुवैद्यकीय विभागाकडून भटक्या कुत्र्यांना उचलून नसबंदी करून पुन्हा सोडण्यात येते. तसेच नागरिकांना चवणाऱ्या कुत्र्यांना उचलण्यात येते.

( श्री कोटियाना, पशुवैद्यकीय अधिकारी, पिंपरी चिंचवड मनपा)

▶️या राज्यांत भटक्या प्राण्यांची सर्वाधिक दहशत :-

या आकडेवीरीत महाराष्ट्राचाही क्रमांक वरचा आहे. आपल्या राज्यातही चावा घेतल्याची अनेक प्रकरणे होत आहेत. गेल्या साडे तीन वर्षांच्या विचार केल्यास

महाराष्ट्र- 15.75 लाख
तामिळनाडू 20.70 लाख
पश्चिम बंगाल- 12.09 लाख
गुजरात – 11.09 लाख
आंध्रप्रदेश- 9.51 लाख
बिहार- 5.57 लाख
मध्य प्रदेश – 5.30 लाख
ओडिशा- 3.91 लाख

गेल्या साडे तीन वर्षांत भटके कुत्रे आणि प्राण्यांनी चावा घेतल्याच्या देशभरात 1कोटी 60 लाख 62 हजार 815 प्रकरणे समोर आली आहेत. या सगळ्याची दिवसाची सरासरी विचारात घेतली तर ती साधारणपणे 12 हजार 256 इतकी मोठी आहे.

Maharashtra14 News

Recent Posts

रोहित पवारांचा अजित पवारांवर निशाणा … अजित दादा तुमच्यात जर धाडस असेल तर ….

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०४ मे) : बारामती लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या…

15 hours ago

तुमच्या इथे कोणाविरुद्ध कोण? जाणून घ्या, … पहा, महाराष्ट्रातील सर्व 48 मतदारसंघातील उमेदवारांची यादी!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ मे) : महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 47 जागांवरील लढती कशा असतील हे…

3 days ago

अंध दिव्यांग नागरिकांना ब्रेल लिपीतील व्होटर स्लिपचे वाटप

महाराष्ट्र14 न्यूज, (दि.०२ मे) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मा.निवडणूक…

3 days ago

दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप व आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ मे) : दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप…

4 days ago

‘जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली, तर पुन्हा माझ्याकडे पायरी चढायची नाही … नेत्याने दिला कार्यकर्त्याना दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…

7 days ago