Categories: Uncategorized

चिंचवड मतदारसंघातील धनगर समाजाची ताकद शंकर जगताप यांच्या पाठीशी … शंकर जगताप यांना धनगर क्रांती सेना महासंघाचा जाहीर पाठींबा

महाराष्ट्र 14 न्यूज, दि. १४ नोव्हेंबर २०२४ – चिंचवड विधानसभा मतदारसंघातील भाजप – शिवसेना – राष्ट्रवादी काँग्रेस – रिपाइं (आठवले) मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांना शहरातील विविध सामाजिक, राजकीय संघटनांनी मोठ्या प्रमाणावर पाठींबा दिला असून आता चिंचवड मतदारसंघातील धनगर समाजाची ताकदही जगताप यांच्या पाठीशी उभी राहिली आहे.

पिंपरी चिंचवड शहरातील धनगर क्रांती सेना महासंघ आणि सकल धनगर समाज शंकर जगताप यांच्यासाठी मैदानात उतरले असून काल (बुधवारी) चिंचवड येथील चिंचवडे लॉन्स येथे पार पडलेल्या धनगर समाज बांधवांच्या मेळाव्यात एकमताने शंकर जगताप यांना जाहीर पाठींबा देण्यात आला.

मेळाव्याला उपस्थित हजारो धनगर समाज बांधवांच्या साक्षीने शंकर जगताप यांचे मोठे बंधू विजय जगताप यांच्याकडे संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पाठींब्याचे पत्र दिले. यावेळी धनगर क्रांती सेना महासंघाचे अध्यक्ष भरत महानवर, अर्जुनजी रबारी धनगर गुजरात सरकार
पशु संवर्धन आयोग अध्यक्ष राज्यमंत्री दर्जा, माजी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, माजी उपमहापौर सचिन चिंचवडे, शेखर चिंचवडे, राजेंद्र चिंचवडे, बाबीर मिटकरी, सूर्यकांत गोफने, काळूराम कवितके, संजय अजय दुधभाते, मुकुंद कुचेकर, बाळासाहेब वाघमोडे, प्रकाश श्रीगिरे, अक्षय वायकुळे, अक्षय घायके, नानासाहेब लगस, महादेव कवितके, चंद्रकांत मासाळ, ज्ञानेश्वर वरपे, उमेश पाटमास, सोनाली गडदे, पल्लवी मारकड, रेखा दुधभाते, अंकुश सूर्यवंशी, बालाजी चित्ते, पुरुषोत्तम वाघमोडे, विनोद गायकवाड, रवींद्र पवार, संतोष गाढवे, विनोद गुरमे, नाना मासाळ, संतोष पांढरे, महावीर काळे, संजय नायकवडे, दीपक भोजने शिवाजी आवारे, समाधान सोलंकर, नितीन कोपनर, बंडू मारकड, काका मारकड, मनोज मारकड, बजरंग गडदे, विभीषण घोडके, नवनाथ भिडे, रमेश गाढवे, बिरु व्हनमाने, बळीराम घोडके, सूरज घोडके, गिरीश देवकाते, कल्याण बोकडे या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह हजारो धनगर समाज बांधव उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना महासंघाचे अध्यक्ष भरत महानवर म्हणाले की, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी आजपर्यंत धनगर समाजाच्या हितासाठी आजपर्यंत काहीही केलेले नाही. याउलट महायुती सरकारने सातत्याने धनगर समाजाच्या हिताच्या योजना राबवून त्याचा लाभ समाजाला मिळवून देऊन समाजाचा आर्थिक स्तर उंचविण्याचे काम केले आहे. पुढील काळात पिंपरी चिंचवड शहरातील धनगर समाजाचे प्रश्न विधानभवनात मांडण्यासाठी महायुतीचे उमेदवार शंकर जगताप हेच सक्षम पर्याय असल्याने आम्ही सर्व धनगर समाज बांधव एकजुटीने शंकर जगताप यांच्या पाठीशी उभे राहून त्यांना विधानभवनात पाठवणार असल्याचे, महानवर यावेळी म्हणाले.

Maharashtra14 News

Recent Posts

अखेर राज्य मंत्रिंमंडळाचे खातेवाटप जाहीर, वाचा कुणाला कोणते मंत्रालय

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२१ डिसेंबर : अखेर राज्य मंत्रिमंडळाचं खाते वाटप जाहीर झालं आहे. हिवाळी…

10 hours ago

पुण्यातील चिंतामणी ज्ञानपीठा तर्फे आशा राऊत यांचा तेजस्विनी पुरस्काराने सन्मान

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१७ डिसेंबर : चिंतामणी ज्ञानपीठा तर्फे आशा राऊत यांचा तेजस्विनी पुरस्काराने सन्मान…

3 days ago

अखेर खातेवाटपाचा फॉर्म्युला ठरला! महसूल फडणवीसांकडे, अर्थ खाते अजितदादांकडे, तर ….

महाराष्ट्र व14 न्यूज, दि.१७ डिसेंबर : महाराष्ट्रात सध्या राजकीय घडामोडी वेगाने सुरु आहेत. काही दिवसांपूर्वी…

4 days ago

लाडक्या बहिणींसाठी गुडन्यूज … हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी महायुती सरकारची लाडक्या बहिणींना मोठी ओवाळणी

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१७ डिसेंबर : लाडक्या बहिणींसाठी गुडन्यूज आहे, अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी लाडकी बहीण…

5 days ago

देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रीमंडळात कुणाकुणाचा समावेश

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१५ डिसेंबर :  महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये लोकसभा निकालांच्या उलट निकाल लागल्याचं पाहायला…

7 days ago

शपथ घेतल्यानंतर पहिल्या तासातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली स्वाक्षरी वैद्यकीय मदतीच्या फाईलवर

महाराष्ट्र14 न्यूज, दि.०५ देचेमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पहिल्याच मंत्रिमंडळ…

2 weeks ago