Mumbai : रेस्टॉरंट्स करीता राज्य सरकार नियमावली जाहीर करणार … ऑक्टोबरमध्ये सुरु होण्याची शक्यता

महाराष्ट्र 14 न्यूज : राज्य शासनाने रेस्टॉरंट सुरु करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे तयार केली असून ती सर्व संबंधितांना पाठवण्यात आली आहेत. ती अंतिम झाल्यानंतर रेस्टॉरंट सुरु करण्याबाबतचा निर्णय घेतला जाईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सांगितले. आज मुख्यमंत्र्यांनी राज्यातील औरंगाबाद, पुणे, मुंबई आणि नागपूर येथील रेस्टॉरंट व्यवसायिक संघटनांच्या प्रतिनिधींसोबत चर्चा केली, त्यावेळी ते बोलत होते.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण देशभरात लॉकडाऊन करण्यात आलं होतं. त्यामुळे देशातील सर्वच व्यवहार आणि उद्योगधंदे ठप्प झाले होते. याचा परिणाम राज्याच्या अर्थचक्रावरही झाला होता. तसेच अनेकांचा हातातलं कामंही गेल्यामुळे बेरोजगारीचं संकटंही उभं ठाकलं आहे. अशातच सरकारच्या वतीने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले जात आहेत.

सध्या संपूर्ण देशात अनलॉकची प्रक्रिया सुरु करण्यात आली आणि अनलॉकमध्ये काही गोष्टी टप्प्याटप्प्याने सुरु करण्यात आल्या. लॉकडाऊनला सहा महिने पूर्ण झाले आहेत. अशातच अजूनही राज्यात अनेक गोष्टी बंद आहेत. त्यापैकी एक म्हणजे, रेस्टॉरंट्स. ऑक्टोबरच्या सुरुवातीला राज्यात रेस्टॉरंट्स सुरु करण्याचा निर्णय सरकार घेण्याची शक्यता आहे. त्यासाठी आधी कार्यपद्धती ठरवण्यात येणार आहे.

नेमके रेस्टॉरंट्स कसे सुरु करण्यात येतील? किती टक्के ग्राहकांना रेस्टॉरंट्समध्ये जाण्याची परवानगी असेल? तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक नियमांचं काटेकोरपणे पालन करत सरकार ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून रेस्टॉरंट्स सुरु करण्यासाठी परवानगी देण्याची शक्यता आहे. त्यासाठी नियमावलीही तयार करण्यात येणार आहे. दरम्यान, रेस्टॉरंट्स सुरु करण्याच्या निर्णयामुळे राज्याच्या आर्थिक तिजोरीवरील भार कमी होऊ शकतो. तसेच अनेक लोकांच्या हाताला कामंही मिळू शकतं. तसेच रेस्टॉरंट्सच्या मालकांनाही यामुळे दिलासा मिळणार आहे.

Maharashtra14 News

Recent Posts

मोशीत वादळी वाऱ्यासह पाऊसामुळे “या” ठिकाणी ; भलं मोठं लोखंडी होर्डिंग कोसळलं

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.1६ मे ) : पिंपरी चिंचवड शहरातील मोशी, डुडळगाव, चऱ्होली परिसरात सोसाट्याच्या…

2 days ago

चिंचवड ठरविणार मावळच्या विजयाची गणिते, … ४ जूनला कोणती शिवसेनेचा गाठणार दिल्ली? ?

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ मे) : लोकसभेचे मतदान पार पडल्यानंतर आता मावळ विधानसभा मतदारसंघात मताधिक्य…

4 days ago

नवी सांगवीत या शाळेत झाले बोगस मतदान … तर, मोबाईल बंदी मुळे अनेक मतदार गेले माघारी … पोलिस आणि मतदारांमध्ये हुज्जत

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. १३) मतदान झाले. सकाळी…

5 days ago

भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी मानले मावळ आणि शिरूर च्या मतदारांचे आभार, असे झाली मतदानाची टक्केवारी:

महाराष्ट्र 24 न्यूज, (दि.१३ मे) : आज (दि.१३ मे) पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर आणि पुणे…

5 days ago

नवी सांगवीत मतदानाला शांततेत सुरवात; बा रा घोलप महाविद्यालयात सकाळपासूनच मतदान केंद्रांवर रांगा, कंट्रोल रुमद्वारे प्रशासनाचे लक्ष

wमहाराष्ट्र व14 न्यूज, (दि.१३ मे) : पिंपरी चिंचवड शहरात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी…

6 days ago

अजित पवारांचा निलशे लंके यांना थेट इशारा … अरे, “बेटो तू ज्या शाळेमध्ये शिकतोयस त्या शाळेचा हेडमास्टर अजित पवार आहे”!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगरमध्ये…

1 week ago