Categories: Editor Choice

पिं. चिं.महानगरपालिकेच्या वतीने राबविण्यात येणा-या विविध विकास कामांच्या झालेल्या आणि  येणा-या सुमारे ५५ कोटी १९ लाख रुपये खर्चास स्थायी समितीने दिली मान्यता!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. २२ जुलै २०२१) : महानगरपालिकेच्या वतीने राबविण्यात येणा-या विविध विकास कामांच्या झालेल्या आणि  येणा-या सुमारे ५५ कोटी १९ लाख रुपये खर्चास स्थायी समितीने मान्यता दिली. महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनात आज स्थायी समितीची ऑनलाईन पध्दतीने सभा  पार पडली.  बैठकीच्या अध्यक्षस्थानी अॅड. नितीन लांडगे होते.

महानगरपालिकेच्या दवाखाने व रुग्णालयांसाठी बेडशिट, सोलापुरी चादर व ब्लॅंकेट खरेदी करण्याकरीता येणा-या ५१ लाख ४४ हजार इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली.
ह प्रभागातील जलनि:सारण नलिकांची वार्षिक यांत्रिकी पध्दतीने साफसफाई करणे व चोकअप काढणे कामी येणा-या १ कोटी १९ लाख इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली.

इंदोर शहरातील घनकचरा व्यवस्थापन करत असुन, त्याप्रमाणे पिंपरी चिंचवड शहरातील वार्ड क्र. ७, २८ व २९ या ठिकाणी प्रायोगिक तत्वावर घनकचरा व्यवस्थापन कामासाठी येणा-या ५६ लाख १७ हजार इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली.

प्रभाग क्र.२० कासारवाडी येथील मनपाची प्राथमिक व माध्यमिक शाळा बांधण्याकामी येणा-या १० कोटी २२ लाख इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली.

 

प्रभाग क्र.२५ वाकड येथील मनपा शाळेकरीता नव्याने वर्ग खोल्या बांधणे व आवश्यकतेनुसार इतर स्थापत्य  विषयक कामे करण्याकामी येणा-या ५७  लाख ३१ हजार इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली.

प्रभाग क्र.१० मधील नाल्यांची नाल्यांचे आर.सी.सी व सुधारणा विषयक कामे करण्यासाठी येणा-या ३१ लाख ६९ हजार इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली.

प्रभाग क्र.९ मासुळकर कॉलनी परिसरातील अंतर्गत रस्त्यांचे हॉटमिक्स पद्धतीने डांबरीकरण करण्याकामी येणा-या ४० लाख ६१ हजार इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली.
प्रभाग क्र.९ खराळवाडी, नेहरुनगर इत्यादी ठिकाणी स्थापत्य विषयक कामे करण्याकामी येणा-या ४३ लाख ६८ हजार इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली.

प्रभाग क्र. ३० मधील रस्त्यांचे डांबरीकरण करण्याकामी येणा-या ३ कोटी १० लाख  इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली.

प्रभाग क्र.३१ मध्ये नवी सांगवी पिंपळे गुरव मिलिटरी हद्दी लगतचा रस्ता यूटीडब्लूटी पध्दतीने विकसित करण्याकरीता येणा-या ३ कोटी ६ लाख इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली.

प्रभाग क्र.३२ सांगवी शाळा इमारतीचे नुतनीकरणाची उर्वरित कामे करण्याकामी येणा-या २ कोटी ६१ लाख इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली.

दापोडी येथील पवना नदीच्या समांतर असलेला १२ मीटर रस्ता विकसित करण्याकरीता येणा-या २ कोटी १० लाख ८६ हजार इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली.

प्रभाग क्र.७ भोसरी मधील  विविध रस्त्यांचे हॉटमिक्स पध्दतीने  डांबरीकरण करण्याकामी येणा-या        १ कोटी ९३ लाख २४ हजार इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली.
प्रभाग क्र.९ नेहरुनगर मधील स्मशानभूमी मधील विद्युत दाहिनीचे स्थापत्य विषयक आणि इतर अनुषंगिक कामे करण्याकामी येणा-या ६ कोटी २३ लाख ८८ हजार इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली.

 

Maharashtra14 News

Recent Posts

महायुतीच्या विजयासाठी भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा शहरात बैठकांचा धडाका पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या १०० हून अधिक नमो संवाद सभा

महाराष्ट्र 24 न्यूज, दि.२५ एप्रिल : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-आरपीआय-मनसे-रासपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंगआप्पा…

2 days ago

गरीब, कष्टकरी व आदिवासींना मोदींनी न्याय दिला – खासदार बारणे … आपटा गावातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश

महाराष्ट्र 14 न्यूज, (उरण, दि. 25 एप्रिल) : गरीब कष्टकरी व आदिवासी लोकांना न्याय मिळवून…

2 days ago

‘दादां’च्या चिरंजिवांच्या ‘वाय प्लस’ दर्जाची सिक्युरिटीचे नेमके कारण काय?

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२३ एप्रिल : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना वाय…

3 days ago

पिंपरी विधानसभा कार्यालयामार्फत सेक्टर ऑफिसर्स यांना ईव्हीएम सिलिंगचे प्रशिक्षण…

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२३ एप्रिल : मावळ लोकसभा निवडणुकीसाठी १३ मे रोजी मतदान होणार आहे…

3 days ago

स्वच्छतेच्या मोहिमेत महिला बचत गटांचा सहभाग वाढविणार, आणखी ४९ सामुदायिक शाैचालये चालविण्यास देणार…

महाराष्ट्र 14 न्यूज,  दि. १९ (प्रतिनिधी) -* पिंपरी-चिंचवड शहर स्वच्छ व सुंदर करण्याच्या मोहिमेत महिला…

1 week ago

पावणेचार लाखांच्या मताधिक्याने मावळची निवडून जिंकू; पत्रकार परिषदेत संजोग वाघेरे पाटील यांचा विश्वास

महाराष्ट्र 14 न्यूज, दि. 17 (प्रतिनिधी) - जसजशी निवडणूक जवळ येऊ लागली तशी प्रचारात रंगत…

1 week ago