Categories: Editor Choice

आमदार ‘लक्ष्मण जगताप’ यांनी केली पिंपरी चिंचवडमध्ये कचराकुंडी मुक्त शहराची सुरुवात … नवी सांगवी-पिंपळे गुरव प्रभाग क्र.३१ ठरला शहरातील पहिला कचरा कुंडी विरहित प्रभाग!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२३जुलै) : पिंपरी चिंचवड शहराचा स्मार्ट सिटी मध्ये सामावेश झाला. या समावेशाचे खरे श्रेय जाते ते या कार्यात अहोरात्र काम करणारे आरोग्य कर्मचाऱ्यांना … आमदार लक्ष्मण जगताप यांच्या चिंचवड मतदारसंघातील  नागरिकांच्या अनेकदा भेटीच्या संवादातून एकच सामाईक तक्रार यायची ती म्हणजे जुनी सांगवी व नवी सांगवीमध्ये पुण्याहून येताना अर्थात प्रवेशद्वारावरच ओसंडून वाहणारा कचरा आणि कचराकुंड्या… गेल्या १०-१५ वर्षांपासून जुनी सांगवी शितोळे पेट्रोल पंप येथील पुलाशेजारी ट्रक भरुन कचरा असायचा. नवी सांगवी शनिमंदीराजवळ दोन मोठ्या कचराकुंड्या ओसंडून भरुन वाहत असायच्या.

आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली नवी सांगवी पिंपळे गुरव प्रभाग क्रमांक ३१ मधील स्थानिक लोकप्रतिनिधीनी याबाबतची माहिती घेऊन उपाययोजना करण्यासाठी या समस्येवर आपल्या प्रभागातील आरोग्य निरीक्षक उध्दव डवरी यांना भेटून उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. यावर दखल घेत आरोग्य निरीक्षक डवरी व त्यांचे आरोग्य कर्मचारींनी दिवस रात्र थांबून कचरा कुंडीमध्ये कचरा टाकणा-या नागरिकांना प्रबोधन करुन विनवणी करुन सदरचा कचरा हा घंटागाडीमध्ये देण्याचे सुचित करत होते. विशेष म्हणजे कोणतीही दंडात्मक कारवाई न करता लोकसहभागातून शनिमंदीर भागातील दोन कचराकुंड्या हटवण्यात आरोग्य विभागाला यामध्ये यश मिळाले.

अशी केली समस्यावर मात :-

याशिवाय काही पुण्यातील हॉटेल व्यावसायिक देखील वाहनांमधून मध्यरात्री कचरा टाकताना शनी मंदिरा समोरील कुंडीत टाकताना आरोग्य कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आले होते त्यावर त्यांनी पुन्हा तोच कचरा त्यांचे वाहनामध्ये टाकला, अशाप्रकारे काही उपद्रवी नागरिकांवर जरबही बसवली. तद्नंतर ह्या वर्षभरात बारा घोलप महाविद्यालय, औंध हॉस्पिटल, रामनगर, मयुरनगरी अशा मोक्याच्या ठिकांणांवरील एकामागून एक कचराकुंडी लोकसहभागातुन त्यांनी प्रभागातुन हटविल्या हे विशेष.

कधी कचरा टाकणा-यांवर दंडात्मक कारवाई करुन तर कधी व्यावसायिक रस्त्यावर कचरा टाकताना आढळून आलेस तोच कचरा त्यांचे व्यावसायिक आस्थापनेत टाकून तसेच काही नागरिकांवर कचरा टाकल्याप्रकरणी गुन्हाही नोंदवून तर कधी शंभरहून अधिक नागरिकांना कचरा उघड्यावर टाकला म्हणून गुलाबपुष्प देवून गांधीगिरी दाखवत शिस्त लावण्याचे काम त्यांनी चांगल्या प्रकारे केलेले आहे. प्रभागामध्ये उघड्यावर जैव वैद्यकीय कचरा टाकणा-या दोन व्यावसायिकांकडून ५००००/- इतकी रक्कमही त्यांनी वसूल केलेली आहे.
याचेच सुवर्णफलित म्हणून आज प्रभाग क्र. ३१ नवी सांगवी पिंपळे गुरव भागात कचरा पडणेचे ठिकाण बंद झालेले आहे.

झोपडपट्टी ही केली कचरा कुंडी विरहित :-

काही दिवसांपासून राजीवगांधीनगर झोपडपट्टी परिसरातही कचरा कुंडीत कचरा टाकणा-या नागरिकांची कचरा टाकण्याची वेळ व कारण याबाबत त्यांची सह्यांनिशी माहिती आरोग्य विभागामार्फत संकलित करणेत येत आहे, याचे कारण म्हणजे कचरा वाहतुकीचे सूक्ष्म नियोजन असे आहे. तसेच सदर समुदायामध्ये डवरी व त्यांचे कर्मचारी यांनी जवळजवळ ४०० रहिवाशी घरांची भेट घेवून त्यांना घरामध्ये निर्माण होणारा कचरा ढकलगाडी/घंटागाडी मध्येच टाकणेबाबत सूचना देणेत आल्या आहेत व इतरत्र कचरा टाकलेस सदरील दंडात्मक कारवाईस व्यक्तिश: स्वत: जबाबदार राहू अशा आशयाच्या पत्रावर स्थानिक रहिवाशांकडून स्वाक्षरी घेणेत आलेले आहेत.

या कचराकुंडी परिसरात भंगार व्यावसायिकांनी रस्त्यावर ठाण मांडून भंगार कचरा जमा केला होता, अशा उपद्रवी व्यावसायिकांवरही दंडात्मक कारवाई करुन व रस्त्यावरील सर्व भंगारमाल कचरा गाडीत टाकून रस्त्याला मोकळा श्वास देण्याचे काम डवरी यांचेकडून झालेले आहे. आज प्रभाग क्र ३१ मधील याभागातील अंतिम कचराकुंडीही ह क्षेत्रीय कार्यालय आरोग्य विभागाकडून हटविण्यात आलेली आहे. आज प्रभाग क्र. ३१ नवी सांगवी-पिंपळे गुरव हा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील शहरातील पहिला प्रभाग आहे
जो कचराकुंडीविरहीत करण्यास सर्वांनाच यश मिळालेले आहे.

लोकप्रतिनिधीं कर्मचाऱ्यांनी केले मोलाचे सहकार्य :-

याबाबत ‘ह’ क्षेत्रीय कार्यालय आरोग्य विभाग यांचे तसेच जनसहभाग, लोकप्रतिनिधी आणिे प्रशासन यांची कामातील सुसूत्रता, नियोजन व कालबध्द कार्यक्रमातुन अशक्य गोष्ट शक्य होते हे यातून समोर येत आहे. याबाबत प्रभागातील सर्व नगरसेवक यांनीदेखील प्रत्येकवेळी पाठपुरावा केलेलाच होता, त्यांचेही योगदान याबाबत महत्वाचे आहे. याबाबत स्थानिकांनी देखील आज दिनांक २३ जुलै २०२१ रोजी गुरुपोर्णिमेनिमित्त व कुंडीविरहित प्रभाग झाल्यामूळे एकमेकांना पेढे भरवून आनंद साजरा करण्यात केला. सदर कामकाज अनिल रॉय आरोग्य वैद्यकीय अधिकारी, बी बी कांबळे आरोग्य कार्यकारी अधिकारी, अभिजीत हराळे ह क्षेत्रीय अधिकारी, रमेश भोसले सहा आरोग्य अधिकारी, चंद्रकांत रोकडे मुख्य आरोग्य निरीक्षक आणि महेश आढाव मुख्य आरोग्य निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माजी स्थायी समिती अध्यक्ष राजेंद्र राजापुरे, आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी केलेल्या प्रयत्नामुळे प्रभाग क्रमांक ३१ हा कचरा कुंडी विरहित प्रभाग होण्यात यशस्वी झाला.

यावेळी ‘ह’ क्षेत्रीय कार्यालय पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे मुख्य आरोग्य निरीक्षक महेश आढाव, आरोग्य निरीक्षक उद्धव डवरी, ,आरोग्य सहाय्यक दशरथ बांबळे, आरोग्य मुकादम विकास कांबळे, कविता गोहेर ,आरोग्य कर्मचारी सिद्धार्थ जगताप, कुणाल कांबळे, रामदास मोझे ,गणेश भंडारी, मारुती देवकुळे, आनंदा फंड ,विनोद कांबळे, दिलीप नाईकनवरे, प्रमोद ढमाळ ,ए जी एन्व्हायरो संस्था सुपरवायझर प्रकाश इंगळे इत्यादी कर्मचारी उपस्थित होते.

Maharashtra14 News

Recent Posts

तुमच्या इथे कोणाविरुद्ध कोण? जाणून घ्या, … पहा, महाराष्ट्रातील सर्व 48 मतदारसंघातील उमेदवारांची यादी!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ मे) : महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 47 जागांवरील लढती कशा असतील हे…

58 mins ago

अंध दिव्यांग नागरिकांना ब्रेल लिपीतील व्होटर स्लिपचे वाटप

महाराष्ट्र14 न्यूज, (दि.०२ मे) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मा.निवडणूक…

8 hours ago

दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप व आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ मे) : दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप…

1 day ago

‘जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली, तर पुन्हा माझ्याकडे पायरी चढायची नाही … नेत्याने दिला कार्यकर्त्याना दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…

4 days ago

महायुतीच्या विजयासाठी भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा शहरात बैठकांचा धडाका पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या १०० हून अधिक नमो संवाद सभा

महाराष्ट्र 24 न्यूज, दि.२५ एप्रिल : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-आरपीआय-मनसे-रासपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंगआप्पा…

1 week ago