Categories: Editor Choice

जुनी सांगवीतील सर्व गणपती विसर्जन घाट व सर्वच यंत्रण सज्ज… तर सामाजिक कार्यकर्त्यांनी स्थापत्य विभागाच्या वतीने केलेल्या या कामाचे धन्यवाद देत मानले आभार

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ सप्टेंबर) : दरवर्षीप्रमाणे पाठपुरावा करून काही सामाजिक कार्यकर्त्यांनी सांगवीतील गणपती विसर्जन घाट अहिल्यादेवी घाट, वेताळ महाराज व दत्त मंदिर जवळचा घाट,पवना नगर घाट तसेच सर्व पाण्याचे हौद ॲाईल पेटींग करून पाणी भरून तयार केले आहेत, तसेच पवना नगरचे काही कामही चालू आहे. पवना नगरला मोठा रेडिमेड हौद ठेवण्याचे नियोजन आहे, सी.सी.कॅमेरे, निर्माल्य कलश, हॅलोजन यावेळी लाईट गेली तर अडचन होऊ नये याकरीता काही घाटावर जनरेटर देखिल बसवले आहेत.

बाप्पांचे विसर्जन १ दिवस असेल तरी ११ वा दिवसापर्यत घरगुती गणपती चे विसर्जन असते, त्यामुळे विसर्जनकरीता सर्वच यंत्रणा सज्ज झाली आहे. दुरावस्थेबद्दल वारंवार कामाची तक्रार संमधित अधिकाऱ्यांकडे मनसेच्या माध्यमातून चालूच होती, काम युध्दपातळीवर चालू झाले होते कारण आयुक्तांनी तसे आदेशच दिले होते व आज १००% काम पुर्ण झाले आहे. या कामाची “ह” प्रभाग अधिकाऱ्यानी आज पाहणी केली व काही छोटे मोठे काम राहिले असेल ते लवकर पुर्ण करून देऊ असे आश्वासन दिले होते तेही पुर्ण केले आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर विसर्जन घाट व श्री . दत्त मंदीर विसर्जन घाट व कृत्रिम विसर्जन हौद येथे विसर्जनाची सर्व व्यवस्था अतिशय उत्तम प्रकारे करण्यात आली आहे. त्यामुळे चांगल्या कामाचेही कौतुक झाले पाहिजे, म्हणून काही सामाजिक कार्यकर्त्यांनी स्थापत्य विभागाचे सर्वांच्या वतिने केलेल्या या कामाचे मनःपुर्वक धन्यवाद व आभार ही मानलेत.

गणेश भक्तांनो आपण हे करू या :-

1 ) आपल्या बाप्पाला पर्यावरण पूरकच निरोप देऊया . • विसर्जन कुंडामध्येच गणपती मूर्तीचे विसर्जन करा . • निर्माल्य टाकण्यासाठी निर्माल्य वाहनाचा किंवा निर्माल्यकुंडाचा वापर करा . • नदी , तलाव , शहर आणि त्यालगतचा परिसर स्वच्छ ठेवून निसर्गाचा आणि बाप्पाचा आदर राया .

2 ) ऐकूया बाप्पाचा संदेश , स्वच्छ ठेवूया आपला प्रदेश ! आपला परिसर स्वच्छ व प्रदूषण मुक्त ठेवून पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करुया !

3 ) नका करू निसर्गाचा -हास , स्वच्छ परिसरात लाभेल बाप्पाचा सहवास … आपला परिसर स्वच्छ व प्रदूषण मुक्त ठेवून पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करुया !

4 ) नद्या – तलाव नाही निर्माल्य फेकण्याची जागा , जलप्रदूषण करु नको स्वच्छतेला बाधा या गणेशोत्सवात जमा होणारे • निर्माल्य पालिकेच्या निर्माल्य कुंडातच टाकूया आणि आपल्या परिसर स्वच्छ व निरोगी राखूया .

Maharashtra14 News

Recent Posts

तुमच्या इथे कोणाविरुद्ध कोण? जाणून घ्या, … पहा, महाराष्ट्रातील सर्व 48 मतदारसंघातील उमेदवारांची यादी!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ मे) : महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 47 जागांवरील लढती कशा असतील हे…

2 days ago

अंध दिव्यांग नागरिकांना ब्रेल लिपीतील व्होटर स्लिपचे वाटप

महाराष्ट्र14 न्यूज, (दि.०२ मे) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मा.निवडणूक…

2 days ago

दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप व आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ मे) : दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप…

3 days ago

‘जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली, तर पुन्हा माझ्याकडे पायरी चढायची नाही … नेत्याने दिला कार्यकर्त्याना दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…

6 days ago

महायुतीच्या विजयासाठी भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा शहरात बैठकांचा धडाका पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या १०० हून अधिक नमो संवाद सभा

महाराष्ट्र 24 न्यूज, दि.२५ एप्रिल : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-आरपीआय-मनसे-रासपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंगआप्पा…

1 week ago