म्युकरमायकोसिसचा धोका पिंपरी चिंचवड शहरात वाढला … यशवंतराव चव्हाण रुग्णालयात १२ रुग्ण दगावले!

महाराष्ट्र 14 न्यूज,(दि.१७मे) :राज्यात कोरोना रुग्णांमध्ये आता म्युकरमायकोसिसचा धोका वाढलाय. राज्यातील अनेक भागात म्युकरमायकोसिसचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. पिंपरी-चिंचवड शहरातही म्युकरमायकोसिसचे रुग्ण आढळले आहेत. महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात या आजारामुळे 12 रुग्ण दगावले आहेत. तर दोन दिवसात 70 रुग्ण दाखल झाले आहेत.  यशवंतराव चव्हाण रुग्णालयात रोज 3 रुग्णांवर शस्त्रक्रिया केली जात आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील खासगी रुग्णालयांमध्येही म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

म्युकरमायकोसिस अर्थात काळी बुरशी या आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत असल्याने पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. शहरातील सर्वात मोठ्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात म्युकरमायकोसिसच्या 12 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती महापालिकेनं दिलीय. तर दोन दिवसांत 70 रुग्ण रुग्णालयात दाखल झाले आहेत. पिंपरी-चिंचवडमधील खासगी रुग्णालयांमध्येही म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तो आकडा तर वेगळाच आहे.

▶️म्युकरमायकोसिस काय आहे?

म्युकरमायकोसिस’ या आजाराची चर्चा अलीकडे सतत होत आहे. काय आहे तो? वातावरणात असलेल्या जिवाणू, विषाणू आणि बुरशी (फंगस) या सूक्ष्म जंतूंमुळे माणसाला विविध आजार होतात. ‘म्युकरमायकोसिस’ हा बुरशीजन्य आजार आहे आणि तो करोनाची लाट येण्यापूर्वीपासूनच आहे. रोगप्रतिकारशक्ती कमी असणं, रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणाबाहेर वाढणं आणि अतिमात्रेची ‘स्टिरॉइड्स’ दीर्घकाळ घेणं, या तीन महत्त्वाच्या कारणांमुळे ‘म्युकर’ बुरशीचा संसर्ग होऊन, ‘म्युकरमायकोसिस’ होतो. कॅन्सरग्रस्त, मूत्रपिंड किंवा इतर अवयवांचं प्रत्यारोपण झालेल्या; तसंच डायलिसिसवर असलेल्या रुग्णांची प्रतिकारशक्ती कमी होत असल्यानं, ‘म्युकर’चा संसर्ग होण्याचा धोका अधिक असतो.

म्युकरमायकोसिस’ हा बुरशीजन्य रोग सध्या करोनाबरोबर त्रास देत असला, तरी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून सार्वजनिक स्वच्छतेला खूप महत्त्व आहे. सार्वजनिक स्वच्छता पाळणं, ही जनतेची आणि सरकारची सामूहिक बांधिलकी हवी. त्यातून बुरशीचा फैलाव थांबू शकतो.

Maharashtra14 News

Recent Posts

मतदान जनजागृतीत व्यापा-यांचा सहभाग तसेच नवोदीत मतदार आणि प्रथमच मतदानासाठी मूकबधिर पहिलवान उत्सुक….

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०७) : पुणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.सुहास दिवसे यांच्या नियंत्रणाखाली…

9 hours ago

मतदान करताना वोटिंग कार्ड नसल्यास या १२ पैकी एक ओळखपत्र ग्राह्य धरणार

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. ०७ मे) :आज (०७ मे) ज्येष्ठ नेते शरद पवार आणि काँग्रेसचे…

16 hours ago

क्रिकेट खेळताना गुप्तांगावर बॉल लागल्याने …. पुण्यातील ११ वर्षीय कुस्तीपटूचा दुर्दैवी मृत्यू

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : क्रिकेट खेळत असताना गुप्तांगावर चेंडू लागल्याने ११ वर्षीय मुलाचा…

1 day ago

बारामतीत शरद पवारांनी लावली फिल्डींग … कोणाकडे कोणती जबाबदारी?? …. !!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : लोकसभा निवडणुकीसाठी  येत्या 7 मे रोजी तिसऱ्या टप्प्यातील मतदान…

1 day ago

सावधान : सांगवीत गॅस चोरी करून काळ्या बाजारात चढ्या दराने होतेय विक्री … चोरी करणारा तरुण ताब्यात

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी भागात गॅस चोरी करून काळ्या…

2 days ago