Shikrapur : राष्ट्रवादीने हाकललेला माजी पदाधिकारी निघाला आरोपी … पुण्यात निवृत्त पोलिसाच्या शेतातून रोज सहा टँकर पाणीचोरी

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१८मे) : सेवानिवृत्त पोलिसाच्या शेतातील विहिरीतून जबरदस्तीने पाणी चोरी करत जमीन बळकावण्याचा प्रयत्न होत असल्याचा प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे. आरोपी भावांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी मंगलदास बांदल हा राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षातून हकालपट्टी केलेला माजी प्रदेश उपाध्यक्ष असल्याचं समोर आलं आहे.

आरोपी मंगलदास बांदल आणि त्याच्या भावाविरोधात सेवानिवृत्त पोलीस ज्ञानदेव तनपुरे यांनी पोलिसात तक्रार दिली आहे. बांदल भावंडं तनपुरेंच्या शेतातील विहिरीतून जबरदस्तीने पाणी चोरी करुन जमीन बळकावण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप आहे. पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर पोलिस ठाण्यात मंगलदास बांदल आणि त्याचा भाऊ बापूसाहेब बांदल या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ज्ञानदेव तनपुरे यांच्या विहिरीतून बांदल आणि त्याचा भाऊ हे दररोज जबरदस्तीने सहा टँकर पाणी चोरुन नेत होते. तसेच तनपुरेंच्या मालकीची जमीन बळकावण्याचाही बांदल भावांचा प्रयत्न होता, असा तनपुरे यांचा आरोप आहे.

Maharashtra14 News

Recent Posts

मतदान जनजागृतीत व्यापा-यांचा सहभाग तसेच नवोदीत मतदार आणि प्रथमच मतदानासाठी मूकबधिर पहिलवान उत्सुक….

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०७) : पुणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.सुहास दिवसे यांच्या नियंत्रणाखाली…

5 hours ago

मतदान करताना वोटिंग कार्ड नसल्यास या १२ पैकी एक ओळखपत्र ग्राह्य धरणार

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. ०७ मे) :आज (०७ मे) ज्येष्ठ नेते शरद पवार आणि काँग्रेसचे…

13 hours ago

क्रिकेट खेळताना गुप्तांगावर बॉल लागल्याने …. पुण्यातील ११ वर्षीय कुस्तीपटूचा दुर्दैवी मृत्यू

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : क्रिकेट खेळत असताना गुप्तांगावर चेंडू लागल्याने ११ वर्षीय मुलाचा…

1 day ago

बारामतीत शरद पवारांनी लावली फिल्डींग … कोणाकडे कोणती जबाबदारी?? …. !!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : लोकसभा निवडणुकीसाठी  येत्या 7 मे रोजी तिसऱ्या टप्प्यातील मतदान…

1 day ago

सावधान : सांगवीत गॅस चोरी करून काळ्या बाजारात चढ्या दराने होतेय विक्री … चोरी करणारा तरुण ताब्यात

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी भागात गॅस चोरी करून काळ्या…

2 days ago