Google Ad
Uncategorized

“तुला जिवंत सोडणार नाही” म्हणत,… रस्त्यात अडवून रिक्षा चालकाला लोखंडी रॉडने बेदम मारहाण..

महाराष्ट्र 14 न्यूज,(दि. १९ ऑगस्ट २०२३) : रिक्षा घेवुन फिर्यादीचा भाऊ घरी जात होता. त्या दरम्यान आरोपी रिक्षामधुन तिथे आले. त्यावेळी आरोपी हा फिर्यादी यांच्या भावास ‘तु माझ्या आई वडीलांना शिवीगाळ का केली? असे म्हणत ‘तुला जिवंत सोडणार नाही’ असे बोलून आरोपीने त्याच्या हातातील लोखंडी रॉड फिर्यादीच्या भावाच्या डोक्यात व डाव्या पायाच्या नडगीवर मारहान करून फ्रैक्चर केले. सह आरोपी याने त्याच्या हातातील लाकडी दांडक्याने फिर्यादीच्या भावाच्या डोक्यावर व अंगावर मारहान केली व तिसऱ्या सह आरोपीने शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहान केली, असे फिर्यादीत म्हटले आहे.

हा प्रकार (दि. १७) रोजी रात्री १०.०० च्या सुमारास परमेश्वर मार्केट, शिवाजीवाडी, मोशी येथे घडला. फिर्यादी अमोल शरद राजगुरू (रा. मोशी) यांनी यश प्रदिप पाटोळे (रा. मोशी), सचिन सोनवणे (रा. चाकण), दशरथ ठाकुर यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.

Google Ad

भोसरी एमआयडीसी पोलिसांनी ३६७/२०२३ भा.द.वि कलम ३०७, ३२३, ५०४,५०६, ३४ प्रमाणे आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. सपोनि पांचाळ पुढील तपास करीत आहेत.

Google Ad

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!