पंतप्रधान आवास योजनेतील पिंपरी चिंचवड मधील आर्थिक दुर्बल घटकातील ३६६४ घरांसाठी सोमवारी होणार सोडत!

महाराष्ट्र 14 न्यूज : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत केंद्रीय गृहनिर्माण व शहरी गरीबी निर्मुलन मंत्रालयाने निर्गमित केलेल्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या मार्गदर्शन सुचनांचा अवलंब करुन ठिकठिकाणी आरक्षित जागांवर सर्वांसाठी घरे संकल्पनेवर आधारीत प्रधानमंत्री आवास योजना राबविणेत येत आहे . 

केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत आर्थिक दृष्टया दुर्बल घटकांसाठी च – होली , रावेत व बो – हाडेवाडी येथे स्वस्त घरकुल योजना राबविण्यात येणार आहे . सदर योजनेस मा.महापालिका सभेने दि .26 फेब्रुवारी 2020 रोजी मान्यता दिलेली आहे . या योजनेसाठी दि .17 / 08 / 2020 ते 10/10/2020 या कालावधीत नागरिकांकडून अर्ज मागविणेत आले होते . या योजनेकरीता एकूण 47878 इतके अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी 47801 अर्ज पात्र ठरलेले आहेत . सदर प्रकल्पात एकूण 3664 घरे ( सदनिका ) उपलब्ध असून यात च-होली 1442, रावेत 934 तर बो-हाडेवाडी 1288 अशी आहेत. या योजनेकरीता अनुसूचित जाती , अनुसूचित जमाती , दिव्यांग व इतर याप्रमाणे केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार आरक्षण असेल .

या योजनेकरीता 3664 सदनिकेची निवड यादी व त्याच प्रमाणात प्रतिक्षा यादी तयार करण्यात येणार आहे . या प्रकल्पामध्ये सदनिका धारकास प्रथमत : 10 % स्वहिस्सा भरावा लागेल . या योजनेची सोडत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या Facebook पेजवर Live व YouTube व्दारे दाखविण्यात येणार असल्याने नागरिकांनी सोडतीच्या ठिकाणी कोरोना आजाराचा प्रार्दुभाव रोखण्याच्या दृष्टीकोनातून गर्दी करु नये . सोडतीचा सविस्तर तपशिल महापालिकेच्या अधिकृत वेबसाईटवर व वर्तमानपत्रात प्रसिध्द करण्यात यईल, अशी माहिती सहाय्यक आयुक्त राजेश आगळे ( झो.नि. पु. ) यांनी दिली आहे.

या प्रकल्पाची सोडत दि .11 जानेवारी 2021 रोजी दुपारी 3.00 वाजता प्रा.रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह चिंचवड येथे आमदार तथा माजी महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या शुभहस्ते होणार असून अजितदादा पवार ( उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री पुणे जिल्हा ) यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होईल . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर उषा उर्फ माई ढोरे या राहतील, यावेळी आमदार लक्ष्मण जगताप , आमदार महेश लांडगे तसेच खासदार श्रीरंग उर्फ आप्पा बारणे , श्रीमती सुप्रिया सुळे , डॉ.अमोल कोल्हे , मा.आमदार संग्राम थोपटे , आण्णा बनसोडे यांची विशेष उपस्थिती असेल .

Maharashtra14 News

Recent Posts

मोशीत वादळी वाऱ्यासह पाऊसामुळे “या” ठिकाणी ; भलं मोठं लोखंडी होर्डिंग कोसळलं

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.1६ मे ) : पिंपरी चिंचवड शहरातील मोशी, डुडळगाव, चऱ्होली परिसरात सोसाट्याच्या…

3 days ago

चिंचवड ठरविणार मावळच्या विजयाची गणिते, … ४ जूनला कोणती शिवसेनेचा गाठणार दिल्ली? ?

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ मे) : लोकसभेचे मतदान पार पडल्यानंतर आता मावळ विधानसभा मतदारसंघात मताधिक्य…

4 days ago

नवी सांगवीत या शाळेत झाले बोगस मतदान … तर, मोबाईल बंदी मुळे अनेक मतदार गेले माघारी … पोलिस आणि मतदारांमध्ये हुज्जत

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. १३) मतदान झाले. सकाळी…

5 days ago

भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी मानले मावळ आणि शिरूर च्या मतदारांचे आभार, असे झाली मतदानाची टक्केवारी:

महाराष्ट्र 24 न्यूज, (दि.१३ मे) : आज (दि.१३ मे) पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर आणि पुणे…

6 days ago

नवी सांगवीत मतदानाला शांततेत सुरवात; बा रा घोलप महाविद्यालयात सकाळपासूनच मतदान केंद्रांवर रांगा, कंट्रोल रुमद्वारे प्रशासनाचे लक्ष

wमहाराष्ट्र व14 न्यूज, (दि.१३ मे) : पिंपरी चिंचवड शहरात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी…

6 days ago

अजित पवारांचा निलशे लंके यांना थेट इशारा … अरे, “बेटो तू ज्या शाळेमध्ये शिकतोयस त्या शाळेचा हेडमास्टर अजित पवार आहे”!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगरमध्ये…

1 week ago