महाराष्ट्र 14 न्यूज : पुणे पदवीधर मतदारसंघाच्या मनसेच्या उमेदवार रुपाली पाटील ठोंबरे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पुणे पदवीधर मतदारसंघातील उमेदवार रुपाली पाटील यांना धमकी देणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी साताऱ्यातून या व्यक्तीला ताब्यात घेतले. मोहन अंबादास शितोळे असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. तो एक जोगता असून भिक्षा मागून आपली गुजराण करतो.
काही दिवसांपूर्वी रुपाली पाटील यांना हा धमकीचा फोन आला होता. ‘जिथे असशील तिथे संपवून टाकू. आमदार होण्याचा प्रयत्न करु नकोस’, अशा भाषेत पाटील यांना धमकी देण्यात आली होती.
यानंतर रुपाली पाटील यांनी पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली होती. या घटनेची मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही गंभीर दखल घेतली होती. ‘तू तुझा प्रचार जोरात कर, बाकी मी बघतो’, असे राज ठाकरे यांनी फोनवर रुपाली पाटील यांना सांगितले होते. तेव्हापासून खडक पोलिसांकडून धमकी देणाऱ्या व्यक्तीचा शोध घेतला जात होता. पोलिसांनी रुपाली पाटील यांना आलेल्या मोबाईल क्रमांकाचा तपशील जमवण्यास सुरुवात केली. हा तपशील आल्यानंतर पोलिसांना शितोळे याच्या पहिल्या पत्नीचा शोध लागला.
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२० मे) : नागरिकांशी थेट संवाद साधता यावा, तक्रारदारांची गैरसोय होऊ नये…
महाराष्ट्र 24 न्यूज, दि. २० मे २०२४ - पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने शहरातील अनधिकृत जाहिरात…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२० मे) : महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक मंडळाच्यावतीनं (MSBSHSE) बारावीच्या परीक्षेच्या निकालाची…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.1६ मे ) : पिंपरी चिंचवड शहरातील मोशी, डुडळगाव, चऱ्होली परिसरात सोसाट्याच्या…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ मे) : लोकसभेचे मतदान पार पडल्यानंतर आता मावळ विधानसभा मतदारसंघात मताधिक्य…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. १३) मतदान झाले. सकाळी…