Google Ad
Uncategorized

भाजपच्या अश्विनी जगताप यांच्या प्रचारासाठी माजी मंत्री पंकजा मुंडे … मराठवाड्याच्या रणरागिनीची चिंचवडकरांना साद..!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. १९ फेब्रुवारी) : स्व. लक्ष्मण जगताप यांनी पिंपरी चिंचवड शहरातील प्रश्नांसाठी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आणि त्यानंतर ते भाजपमध्ये आले व त्यावेळी राज्यात भाजप-शिवसेना युतीची सत्ता आली. युतीची सत्ता आल्यानंतर पिंपरी-चिंचवडचे सर्व प्रश्न सोडवण्यात आले. आताच्या सरकारने शास्तीकराचा प्रश्नही कायमचा सोडवला आहे. चिंचवडच्या जनतेने अश्विनी लक्ष्मण जगताप यांना साथ देऊन दिवंगत लक्ष्मण जगताप यांच्या राजकीय कारकि‍र्दीवर आणि त्यांनी केलेल्या विकासकामांवर प्रेम व्यक्त करावे, असे आवाहन भाजपच्या नेत्या व माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी अश्विनी जगताप यांच्या प्रचार सभेदरम्यान चिंचवड येथील रहाटनी येथे रविवारी केले.

पंकजा मुंडे या चिंचवड पोटनिवडणुकीतील भाजप-शिवेसना व मित्र पक्षाच्या उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप यांच्या प्रचारार्थ रहाटणीतील विमल गार्डनमध्ये सभा झाली, त्यावेळी  बोलत होत्या. यावेळी अश्विनी लक्ष्मण जगताप, खासदार श्रीरंग बारणे, माजी खासदार अमर साबळे, भाजपचे शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे, आमदार उमा खापरे, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, प्रदेश प्रवक्ते एकनाथ पवार, रिपब्लिकन पार्टी आठवले गटाचे शहराध्यक्ष स्वप्निल कांबळे, राज्याच्या नेत्या चंद्रकांता सोनकांबळे, राष्ट्रीय समाज पक्षाचे शहराध्यक्ष भारत महानवर यांच्यासह भाजप, शिवसेना, रयत क्रांती संघटना, शिवसंग्राम संघटना आणि प्रहार संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Google Ad

यावेळी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, “दिवंगत गोपीनाथ मुंडे साहेब खासदार झाले आणि केंद्रात मंत्री झाले. त्यानंतर सहाव्या दिवशीच त्यांचा मृत्यू झाला. या धक्क्यातून आमच्या कुटुंबांसह त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या लाखो लोकांना सावरता आले नाही. गेलेल्या माणसाची जबाबादारी सांभाळताना काय कसरत करावी लागते याची मला जाणीव आहे. आज दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांनाही तशीच कसरत करताना मी पाहिले आहे. पती आपल्यामध्ये नाही हे दुःख बाजूला ठेवून संयम आणि जबाबदारीने त्या वागत आहेत. लोकांसमोर बोलत आहेत. एक स्त्री म्हणून मला त्यांचा अभिमान वाटतो.

आज मी दिवंगत लक्ष्मण जगताप यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी येथे आले आहे. त्यांच्या पत्नी अश्विनी लक्ष्मण जगताप यांच्या पाठीशी एक बहीण म्हणून उभे राहण्यासाठी मी आले आहे. माझा बाप अचानक गेल्यानंतर मला जनसेवेसाठी वाघीण व्हावे लागले. अश्विनी जगताप या सुद्धा वाघीणच आहेत. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांनी अनेक वर्षे सेवा केली. लक्ष्मणभाऊंनी शून्यातून विश्व निर्माण केले. पिंपरी-चिंचवडचा विकास करताना लक्ष्मण जगताप लढले. ते अपक्ष आमदार असताना काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार होते. आमदारकीची राजीनामा देऊन ते भाजपमध्ये आले. भाजपचे सरकार आल्यानंतर त्यांनी शहरातील प्रलंबित आणि किचकट प्रश्न सोडवले. या राज्यात सामान्यांची चिंता करणारी सत्ता प्रस्थापित झाली आहे. सत्तेबाहेर असतानाही येथील जनतेने दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्यावर प्रेम केले. त्यांचे शहराच्या विकासाचे राहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांच्या पत्नी अश्विनी लक्ष्मण जगताप यांना साथ देऊन त्यांच्या कारकि‍र्दीवर प्रेम व्यक्त करा, चिंचवडच्या जनतेने अश्विनी जगताप यांना विजयी करून दिवंगत लक्ष्मण जगताप यांनी केलेल्या कामांवर प्रेम व्यक्त करावे; असे आवाहन त्यांनी यावेळी बोलताना केले.

 

Google Ad

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!