Google Ad
Uncategorized

नवी सांगवी येथील प्रतिभा महिला प्रतिष्ठान संचलित द न्यू मिलेनियम इंग्लिश मीडियम स्कूल व जुनियर कॉलेजचा दहावी चा निकाल शंभर टक्के

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१३ मे २५.: नवी सांगवी येथील प्रतिभा महिला प्रतिष्ठान संचलित द न्यू मिलेनियम इंग्लिश मीडियम स्कूल व जुनियर कॉलेज चा शंभर टक्के निकाल लागला असून या निकालात पुन्हा एकदा मुलींनी बाजी मारली आहे प्रथम क्रमांक श्रुतिका राजेश सुरकुले (९७.८०%) द्वितीय क्रमांक पूर्वा दिलीप कोळी (९५.६०%) तर तृतीय क्रमांकाने अभिषेक विनोद शिंदे (९५.२०%) गुण मिळवून यशाचे मानकरी ठरले. विशेष आनंदाची बाब म्हणजे ४९ विद्यार्थी डिस्टिंक्शन ३३ विद्यार्थी फर्स्ट क्लास व ८ विद्यार्थी पास क्लास मध्ये येऊन नऊ वर्षापासून ची शंभर टक्के निकालाची परंपरा अखंडित चालू राहिली.

संस्थेचे सचिव आमदार शंकर शेठ जगताप उपाध्यक्ष विजय जगताप संस्था सदस्य स्वाती पवार मॅडम मुख्याध्यापिका इनायत मुजावर मॅडम यांच्यासह सर्व संस्था सदस्य शिक्षकांनी या सर्व यशस्वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले संस्थेचे सचिव व आमदार शंकर शेठ जगताप यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करत या विद्यार्थ्यांना पुढच्या शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Google Ad
Google Ad

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!