महाराष्ट्र 14 न्यूज, दि.30ऑक्टोबर :- प्रतिभा महिला प्रतिष्ठान संचलित The New Millennium English Medium School and Junior College या शाळेतील विद्यार्थ्यांनी पूरग्रस्त सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांसाठी सामाजिक बांधिलकी जपत स्वयंस्फूर्तपणे निधी संकलन केले. विद्यार्थ्यांकडून एकूण ₹21,500 इतकी रक्कम जमा झाली असून ती रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधी (Chief Minister’s Relief Fund) मध्ये जमा करण्यात आली आहे.
या उपक्रमात विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. शाळेच्या मुख्याध्यापक इनायत इर्शाद मुजावर यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत सांगितले की, “विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक संवेदनशीलता आणि मदतीची भावना विकसित होणे हीच खरी शिक्षणाची सार्थकता आहे.”

या प्रसंगी शाळेचे संस्थापक आणि माननीय सचिव आमदार शंकर जगताप, विजय जगताप, विकास पवार, प्रो. प्रताप बामणे, व्यवस्थापन प्रतिनिधी सौ. स्वाती पवार तसेच शिक्षकवृंद व विद्यार्थी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या या उदात्त उपक्रमामुळे समाजात संवेदनशीलता, एकता आणि मानवी मूल्यांचा सुंदर संदेश पसरला आहे.

















