Categories: Uncategorized

पिंपरी चिंचवड शहरात विकासाची गंगा आणून त्याची स्मार्ट सिटी म्हणून ओळख करून देणारे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप हे पिंपरी-चिंचवडमध्ये एकमेव नेते

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. १९ फेब्रुवारी) : – पिंपरी चिंचवड शहरात विकासाची गंगा आणून त्याची स्मार्ट सिटी म्हणून ओळख करून देणारे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप हे पिंपरी-चिंचवडमध्ये एकमेव नेते होते, अशा भावना ग्रामस्थांनी व्यक्त केल्या, त्यांनी शहराबरोबरच पिंपळेगुरवलाही उभे केले. एकेकाळी या ठिकाणी साधा रस्ताही नव्हता, त्यावेळी येथील जनतेने त्यांना निवडून दिले होते. जनतेचा विश्वास सार्थ ठरवत त्यांनी ३७ वर्षे आपल्या शहराची सेवा केली. पिंपळेगुरवला त्यांनी कधीही काही कमी पडू दिले नाही. येथील अनेकांना सामाजिक कार्य करताना त्यांनी मोठे केले. आज आमची त्यांच्या कुटुंबियांना गरज असताना आम्ही विरोधकांना मतदान करण्याचे स्वप्नात सुद्धा विचार करू शकत नाही. आम्ही एवढे पण कृतघ्न नाही की लक्ष्मणभाऊंनी केलेला पिंपळेगुरवचा विकास एवढ्या लवकर विसरू. आम्ही प्रत्येक मत लक्ष्मणभाऊंच्या विकासाला देऊन त्यांच्या पत्नी अश्विनी जगताप आणि भाजपला एक लाखाच्या मताधिक्याने निवडून देणार असा निर्धार पिंपळेगुरवच्या जनतेने सोमवारी केला.  

२६ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीतील भाजप, शिवेसना व मित्र पक्ष महायुतीच्या उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप यांनी पिंपळेगुरवमध्ये पदयात्रा काढून प्रचार केला. तसेच त्यांनी काही भागात कोपरा सभाही घेतल्या. पिंपळे गुरव मधील नागरिकांशी संवाद साधून कमळ चिन्हावर मतदान करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी आपल्या भागातील मतदारांना केले. आपले पती स्वर्गीय आमदार लक्ष्मण जगताप यांनी केलेल्या विकासकामांना मत द्या, असेही त्या नागरिकांना म्हणाल्या. यावेळी रिपब्लिकन पक्षाच्या (आठवले गट) राज्याच्या नेत्या चंद्रकांता सोनकांबळे, माजी उपमहापौर नानी घुले, माजी नगरसेवक शशिकांत कदम, सागर आंगोळकर, माजी प्रभाग स्वीकृत सदस्य महेश जगताप, कावेरी जगताप, वैशाली जवळकर, रविना आंगोळकर, दुर्गा आदियाल, पंचशीला दुधारे, अमर आदियाल, राहुल जवळकर, शशिकांत दुधारे, सामाजिक कार्यकर्त्या पल्लवी जगताप यांच्यासह भाजप, शिवसेना व मित्रपक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

भाजपच्या अश्विनी लक्ष्मण जगताप यांचे पिंपळेगुरवमध्ये वास्तव्याला आहेत. त्यांचे एकत्रित कुटुंब पिंपळेगुरमध्येच राहते. त्यामुळे पिंपळेगुरवच्या जनतेशी त्यांचे जिव्हाळ्याचे नाते आहे. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांनी नगरसेवक म्हणून पिंपळेगुरवमधूनच राजकारणाला सुरूवात केली होती. पुढे त्यांनी या भागाचा न भूतो न भविष्यति असा कायापालट केला. या भागाला रस्ताही नव्हता त्यावेळेस ते नगरसेवक म्हणून निवडून आले होते. आता या भागाला चारही बाजूंनी रस्ते जोडले गेले आहेत. पिंपळेगुरवमध्ये प्रशस्त रस्ते, उद्याने, पुरेसे पाणी व इतर मुलभूत सोयीसुविधा उपलब्ध आहेत. त्यांनी या भागाचा कायापालट करत असताना अनेकांना नगरसेवक बनवले. महापौर केले. स्थायी समिती सभापती केले. कित्येक शासकीय कमिट्यांवर अनेकांना संधी दिली.

या पार्श्वभूमीवर त्यांच्या निधनामुळे लागलेल्या पोटनिवडणुकीत त्यांच्या पत्नी अश्विनी लक्ष्मण जगताप यांनी सोमवारी प्रचारानिमित्त संवाद साधल्यानंतर पिंपळेगुरवमधील अनेक लोकांच्या डोळ्यात पाणी आले होते. नागरिकांच्या डोळ्यांतील पाणी पाहून पतीच्या आठवणी दाटून आलेल्या अश्विनी लक्ष्मण जगताप यांनीही डोळ्यातील अश्रूंना वाट मोकळी करून दिली. त्यामुळे प्रचारादरम्यान जागोजागी भावूक वातावरण पाहायला मिळाले. पिंपळेगुरवमधील जनता कुटुंबातीलच सदस्य असल्यामुळे अश्विनी लक्ष्मण जगताप यांनी मनमोकळेपणाने त्यांच्याशी संवाद साधला. नियतीच्या पुढे कोणाचेही चालत नसल्यामुळे माझ्या पतीने केलेल्या विकासकामांमुळे मला मतदान करा, असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले.

त्यांच्या या आवाहनलाही नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. जगताप कुटुंबावर आणि पिंपळेगुरवकरांवर ही वेळ यायला नको होती, अशा भावना पिंपळेगुरवच्या नागरिकांनी व्यक्त केल्या. ही पोटनिवडणूक बिनविरोध देऊन विरोधी पक्षाच्या नेत्यांनी लक्ष्मणभाऊंच्या कार्याला सलाम करायला हवा होता. पण दुटप्पी वागणाऱ्या या नेत्यांना लक्ष्मणभाऊ कधीच समजणार नाहीत. आता आम्ही त्यांना मतदानातून माणुसकी काय असते आणि लक्ष्मणभाऊ कोण होते, हे समजावून सांगणार असल्याचे पिंपळेगुरवमधील नागरिक अश्विनी लक्ष्मण जगताप यांना सांगत होते. पिंपळेगुरवची जनता कृतघ्न नाही. लक्ष्मणभाऊंनी केलेला विकास एवढ्या लवकर विसरणारे आम्ही नाही. लक्ष्मणभाऊंनी मोठे केलेले आपल्यातले काही जण विरोधकांचा झेंडा घेऊन नाचत असले तरी पिंपळेगुरवमधून शंभर टक्के मतदान भाजप आणि लक्ष्मणभाऊंच्या विकासाला, नेतृत्वाला करणार असल्याचा निर्धार नागरिकांनी केला.

Maharashtra14 News

Recent Posts

मोशीत वादळी वाऱ्यासह पाऊसामुळे “या” ठिकाणी ; भलं मोठं लोखंडी होर्डिंग कोसळलं

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.1६ मे ) : पिंपरी चिंचवड शहरातील मोशी, डुडळगाव, चऱ्होली परिसरात सोसाट्याच्या…

3 days ago

चिंचवड ठरविणार मावळच्या विजयाची गणिते, … ४ जूनला कोणती शिवसेनेचा गाठणार दिल्ली? ?

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ मे) : लोकसभेचे मतदान पार पडल्यानंतर आता मावळ विधानसभा मतदारसंघात मताधिक्य…

4 days ago

नवी सांगवीत या शाळेत झाले बोगस मतदान … तर, मोबाईल बंदी मुळे अनेक मतदार गेले माघारी … पोलिस आणि मतदारांमध्ये हुज्जत

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. १३) मतदान झाले. सकाळी…

5 days ago

भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी मानले मावळ आणि शिरूर च्या मतदारांचे आभार, असे झाली मतदानाची टक्केवारी:

महाराष्ट्र 24 न्यूज, (दि.१३ मे) : आज (दि.१३ मे) पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर आणि पुणे…

6 days ago

नवी सांगवीत मतदानाला शांततेत सुरवात; बा रा घोलप महाविद्यालयात सकाळपासूनच मतदान केंद्रांवर रांगा, कंट्रोल रुमद्वारे प्रशासनाचे लक्ष

wमहाराष्ट्र व14 न्यूज, (दि.१३ मे) : पिंपरी चिंचवड शहरात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी…

6 days ago

अजित पवारांचा निलशे लंके यांना थेट इशारा … अरे, “बेटो तू ज्या शाळेमध्ये शिकतोयस त्या शाळेचा हेडमास्टर अजित पवार आहे”!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगरमध्ये…

1 week ago