Categories: Editor Choice

ड्रायव्हिंग लायसन्स बाळगण्याची झंझट संपली … कागदपत्र जवळ नसतानाही पोलीस पकडणार नाहीत

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१एप्रिल २०२२) : आधुनिक आणि धावत्या दुनियेमध्ये आज प्रत्येकाच्या घराबाहेर दुचाकी किंवा चारचाकी उभी असलेली दिसते. गाडी म्हटले की ड्रायव्हिंग लायसन्स आलेच. मात्र बऱ्याचदा कामाच्या ताणात असताना आपण ड्रायव्हिंग लायसन्स घरी विसरून जातो आणि अशावेळी ट्राफिक पोलिसाने पकडल्यावर नसती पंचाईत होते.

खिशाला तर झळ बसतेच शिवाय सर्वासमोर अपमानित झाल्याचीही भावना निर्माण होते. परंतु आता या सर्व झंझटीपासून सुटका मिळणार असून कागदपत्र स्वरुपामध्ये ड्रायव्हिंग लायन्स जवळ न बाळगताही तुम्हा दंड भरण्यापासून वाचणार आहात.

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने 1 ऑक्टोंबर 2021 पासून कागदपत्र बाळगण्याबद्दल काही नियमात बदल केले आहेत. या नियमांपैकी एक म्हणजे आता लोकांना वाहन चालवताना ड्रायव्हिंग लायसन्स आणि आरसी सारखी अन्य महत्वाची कागदपत्रे व्यक्तिगत सांभाळण्याची गरज नाही आहे. रोड ट्रान्सपोर्ट मिनिस्ट्री यांनी मोटार वाहन नियम 1989 संबंधित संशोधन केल्यानंतर आता ड्रायव्हिंग लायसन्स तयार करण्यापासून ते डॉक्युमेंट्स बाळगण्यापर्यंतच्या काही नियमात बदलाव केले आहेत.वाहन संबंधित महत्वाची कागदपत्रे चालकाला आता शासकीय पोटर्ल्सवर अपडेट करता येणार आहे. केंद्र सरकारने वाहन चालकांसाठी ऑनलाईन पोर्टल Digilocker किंवा m-parivahan चा वापर करण्यास सांगितले आहे. येथेच वाहन चालकांना आपली कागदपत्रे अपोलड करता येणार आहेत. असे केल्यानंतर वाहन चालकांना आपली कागजपत्रे डिजिटल पद्धतीने एक्सेस करता येणार आहेत.

🔴कशी आहे प्रक्रिया?

तुम्ही DigiLocker साठी आपला फोन नंबर आणि आधार कार्डसह साइन अप करू शकता.
यासाठी igiLocker अॅप अथवा साइटवर जा आणि युजर्सचे नाव आणि 6 अंकी पिनसह साइन इन करा.
त्यानंतर तुम्हाला आपल्या नोंदणी फोनवर वन टाइम पासवर्ड (OTP) मिळणार आहे.
याठिकाणी सर्च बारमध्ये तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स बघावे लागेल.
त्यानंतर तुम्हाला ज्या राज्यातून ड्रायव्हिंग लायसन्स मिळाले, ते राज्य सिलेक्ट करावे लागेल.
नंतर, DigiLocker मधील Issued Documents लिस्टमध्ये जाऊन तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स पाहू शकता.
याची सॉफ्ट कॉपी PDF बटणावर क्लिक करून डाउनलोड देखील केली जाऊ शकते. आणि ड्रायव्हिंग लायसन्स डाउनलोड करून सेव्ह करु शकता.

Maharashtra14 News

Recent Posts

क्रिकेट खेळताना गुप्तांगावर बॉल लागल्याने …. पुण्यातील ११ वर्षीय कुस्तीपटूचा दुर्दैवी मृत्यू

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : क्रिकेट खेळत असताना गुप्तांगावर चेंडू लागल्याने ११ वर्षीय मुलाचा…

11 hours ago

बारामतीत शरद पवारांनी लावली फिल्डींग … कोणाकडे कोणती जबाबदारी?? …. !!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : लोकसभा निवडणुकीसाठी  येत्या 7 मे रोजी तिसऱ्या टप्प्यातील मतदान…

12 hours ago

सावधान : सांगवीत गॅस चोरी करून काळ्या बाजारात चढ्या दराने होतेय विक्री … चोरी करणारा तरुण ताब्यात

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी भागात गॅस चोरी करून काळ्या…

22 hours ago

देवेंद्र फडणवीस यांना पंढरपूरमध्ये कार्यकर्त्यांकडून एक खास भेट … तर, फडणवीसांनी दिला कार्यकर्त्याला सल्ला

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. सत्ताधारी आणि विरोधक शेवटपर्यंत…

22 hours ago

रोहित पवारांचा अजित पवारांवर निशाणा … अजित दादा तुमच्यात जर धाडस असेल तर ….

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०४ मे) : बारामती लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या…

2 days ago

तुमच्या इथे कोणाविरुद्ध कोण? जाणून घ्या, … पहा, महाराष्ट्रातील सर्व 48 मतदारसंघातील उमेदवारांची यादी!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ मे) : महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 47 जागांवरील लढती कशा असतील हे…

4 days ago