‘खाजगी रूग्णालयात उपचार घेत असलेल्या कोविड बाधित रुग्णांचा संपूर्ण खर्च हा राज्यशासनाच्या मार्फत करावा’ … ‘आमदार लक्ष्मण जगताप’

महाराष्ट्र 14 न्यूज : पुणे व पिंपरी – चिंचवड शहरातील कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता , कोवीडचा प्रसार थांबणे करिता तसेच रुग्णांसाठी कोविड -१९ या महामारीच्या काळापर्यंत सर्व धर्मादाय व खाजगी रुग्णालयामध्ये , ‘ महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना ‘ तातडीने लागू करण्याबाबत चिंचवड विधानसभेचे ‘आमदार लक्ष्मण जगताप’ यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच आरोग्यमंत्र्याना वारंवार पत्राद्वारे कळविले होते .

आमदार लक्ष्मण जगताप’ यांनी पुन्हा निवेदन दिले असून त्यात म्हटले आहे की, माझ्या या विषयाला आपण गांभीर्याने न पाहता याच्यात कुठेतरी दुर्लक्ष झाले असल्याचे दिसून येते . याचा परिणामी स्वरूप आज शहरात वेळेत उपचार न मिळाल्याने कोविड बाधितांच्या मृत्यूच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत असताना दिसून येत आहे . सध्याच्या महामारीच्या भयंकर परिस्थितीत तसेच यामुळे लागू केलेल्या लाकडाऊनमुळे आर्थिक अडचणीस्तव रुग्णांना खाजगी रुग्णालयाचा खर्च पेलवत नाही हे देखील तितकेच सत्य आहे . हे आपण जाणून घेणे गरजेचे आहे . परिणामी या कारणास्तव कोविड बाधित रुग्ण हे खाजगी रुग्णालयात न जाता शासकीय रुग्णालयामध्ये मोठ्या प्रमाणात धाव घेत असल्याचे सध्याचे चित्र आहे .

शासकीय रुग्णालयामध्ये ICU बेडची व venti ची कमतरता होत असून कोविड रुग्णाला ICU बेडची वाट बघावी लागत असल्याने शेवटी रुग्णास बेड अभावी मृत्यूला सामोरे जावे लागत आहे . हे देखील तितकेच सत्य आहे . रुग्ण ICU बेड व venti अभावी दगावण्याचे प्रमाण शहरात दिवसेंदिवस वाढत आहेत . एकीकडे शासन जम्बो कोविड सेंटर सुरु करत असून त्यासाठी कोट्यावधी रुपये खर्च करत आहे . जर शहरातील सर्व खाजगी रुग्णालयांची संख्या एकत्र केल्यास त्यांच्याकडे उपलब्ध असलेले डॉक्टर्स , ICU बेड , venti , इन्फ्रास्ट्रक्चर या सर्वांचे एकत्रीकरण केल्यास रुग्णांसाठी ICU बेड मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतील व शासनास वेगळे जम्बो कोविड सेंटर उभे करण्याची देखील गरज भासणार नाही .

असे केल्यास कोविड बाधित रुग्ण हे खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल होतील व शासकीय रूग्णालयावरती येणारा ताण तणाव कमी होण्यास मदत होईल . तसेच ICU बेड न मिळाल्याने रुग्णांचे होणारे मृत्यूचे प्रमाण कमी होईल . राज्य शासनाने लागू केलेल्या अधिसूचना क्रमांक कोरोना २०२० सी.आर ९ ७ / आरो -५ , सार्वजनिक आरोग्य विभाग नवी मंत्रालय , मुंबई ४०००१ दि . २१ मे २०२० नुसार खाजगी रूग्णालयाने ८० टक्के बेड कोविड १ ९ रुग्णांसाठी राखीव ठेवावेत , यावेळेस रुग्णाची खर्चिक बाजू लक्षात घेणे तितकेच महत्वाचे होते ? रुग्णाला हा खर्च परवडणारा आहे का ? यावर शासनाचे दुर्लक्ष झाल्याचे चित्र दिसून येते .

कोविड १ ९ च्या उपचाराचा खाजगी रुग्णालयातील खर्च हा सर्वसामान्य व गरीब रुग्णांना न पेलवणारा असल्याचे आम्ही आमच्या मागील पत्राद्वारे वेळोवेळी सूचित केले होते व ‘ महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना ‘ सर्व रुग्णालयात ( जोपर्यंत महामारीचा प्रसार आहे तोपर्यंत ) राबविण्यात यावी हे देखील सुचविले होते . परंतु याबाबत आपल्या स्तरावरून कोणतीही अंमलबजावणी केली गेली नसल्याचे दिसून येते .

जर सर्व खाजगी रुग्णालयात आपण ‘ महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना राबविणार नसाल तर आपल्या स्तरारून खाजगी रुग्णालयातील कोविड बाधित रुग्णाचा संपूर्ण खर्च हा शासनामार्फत करण्यात यावा . जेणेकरून कोविड बाधित रुग्णावर खर्चाचा आर्थिक बोजा येणार नाही व वेळेत उपचार होऊन सत्यने प्रमाण कमी होण्यास मदत होईल . असे आमदार लक्ष्मण जगताप यांनी या निवेदनात म्हटले आहे. शासनाने आतातरी याची सुचनेची दखल घ्यावी , गरिब रुग्णांना न्याय द्यावा ही माफक अपेक्षा!

 

Maharashtra14 News

Recent Posts

मोशीत वादळी वाऱ्यासह पाऊसामुळे “या” ठिकाणी ; भलं मोठं लोखंडी होर्डिंग कोसळलं

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.1६ मे ) : पिंपरी चिंचवड शहरातील मोशी, डुडळगाव, चऱ्होली परिसरात सोसाट्याच्या…

2 days ago

चिंचवड ठरविणार मावळच्या विजयाची गणिते, … ४ जूनला कोणती शिवसेनेचा गाठणार दिल्ली? ?

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ मे) : लोकसभेचे मतदान पार पडल्यानंतर आता मावळ विधानसभा मतदारसंघात मताधिक्य…

4 days ago

नवी सांगवीत या शाळेत झाले बोगस मतदान … तर, मोबाईल बंदी मुळे अनेक मतदार गेले माघारी … पोलिस आणि मतदारांमध्ये हुज्जत

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. १३) मतदान झाले. सकाळी…

5 days ago

भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी मानले मावळ आणि शिरूर च्या मतदारांचे आभार, असे झाली मतदानाची टक्केवारी:

महाराष्ट्र 24 न्यूज, (दि.१३ मे) : आज (दि.१३ मे) पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर आणि पुणे…

5 days ago

नवी सांगवीत मतदानाला शांततेत सुरवात; बा रा घोलप महाविद्यालयात सकाळपासूनच मतदान केंद्रांवर रांगा, कंट्रोल रुमद्वारे प्रशासनाचे लक्ष

wमहाराष्ट्र व14 न्यूज, (दि.१३ मे) : पिंपरी चिंचवड शहरात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी…

6 days ago

अजित पवारांचा निलशे लंके यांना थेट इशारा … अरे, “बेटो तू ज्या शाळेमध्ये शिकतोयस त्या शाळेचा हेडमास्टर अजित पवार आहे”!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगरमध्ये…

1 week ago