Categories: Editor Choice

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील क आणि इ प्रभागातील स्थापत्य कार्यकारी अभियंत्यांचे कार्यभारात बदल … आयुक्त शेखर सिंह यांनी दिले आदेश

महाराष्ट्र 14 न्यूज,दि. १४ ऑक्टोबर २०२२ :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील क आणि इ प्रभागातील स्थापत्य कार्यकारी अभियंत्यांचे कार्यभार बदलण्यात आले असून त्यांच्याकडे  आयुक्त शेखर सिंह यांनी स्वतंत्र आदेशाद्वारे नव्याने कार्यभार सोपवले आहेत.

          महानगरपालिकेच्या प्रशासकीय कामकाजाच्या सोयीच्या दृष्टीने तसेच कामकाजामध्ये सुसूत्रता आणण्यासाठी आयुक्त शेखर सिंह  यांच्या आदेशानुसार, क क्षेत्रीय कार्यालयात स्थापत्य विभागात कार्यकारी अभियंता पदावर कार्यरत असलेले संजय घुबे यांच्याकडे आता इ क्षेत्रीय कार्यालयातील स्थापत्य विभागाचा देखील कार्यभार सोपविण्यात आला आहे. त्यांची आस्थापना क क्षेत्रीय कार्यालय स्थापत्य विभागात राहील. इ क्षेत्रीय कार्यालयातील स्थापत्य विभागात कार्यरत असलेले कार्यकारी अभियंता रविंद्र पवार यांच्याकडे आता स्थापत्य उद्यान आणि स्थापत्य क्रीडा विभागांची नव्याने जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यांची आस्थापना स्थापत्य विभागात असणार आहे.

          दरम्यान, स्थापत्य विभागातील कार्यकारी अभियंता पदावर कार्यरत असणारे मनोज सेठिया यांची सहशहर अभियंता या पदावर पदोन्नती झाली आहे. सुरक्षा विभागाचे  विभागप्रमुख म्हणून मुख्य सुरक्षा अधिकारी मेजर उदय जरांडे यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे. याबाबतचे स्वतंत्र आदेशही नुकतेच आयुक्त शेखर सिंह  यांनी निर्गमित केले आहेत.

Maharashtra14 News

Recent Posts

रोहित पवारांचा अजित पवारांवर निशाणा … अजित दादा तुमच्यात जर धाडस असेल तर ….

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०४ मे) : बारामती लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या…

22 hours ago

तुमच्या इथे कोणाविरुद्ध कोण? जाणून घ्या, … पहा, महाराष्ट्रातील सर्व 48 मतदारसंघातील उमेदवारांची यादी!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ मे) : महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 47 जागांवरील लढती कशा असतील हे…

3 days ago

अंध दिव्यांग नागरिकांना ब्रेल लिपीतील व्होटर स्लिपचे वाटप

महाराष्ट्र14 न्यूज, (दि.०२ मे) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मा.निवडणूक…

4 days ago

दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप व आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ मे) : दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप…

4 days ago

‘जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली, तर पुन्हा माझ्याकडे पायरी चढायची नाही … नेत्याने दिला कार्यकर्त्याना दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…

1 week ago