Google Ad
Uncategorized

निवडणूक कसब्याची चर्चा दौंड तालुक्यात … कारण काय? दौंड तालुक्याला दुसरा आमदार मिळणार का?

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२७ फेब्रुवारी) : कसबा व पिंपरी चिंचवड विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या असून राज्यातील महाविकास आघाडी, भारतीय जनता पार्टी व शिंदे गटाच्या बड्या नेत्यांच्या तोफा या विधानसभा मतदारसंघात कडाडल्या आहेत. मात्र कसब्यात निवडणूक होत असताना दौंड तालुक्याला दुसरा आमदार मिळणार का? अशी चर्चा तालुक्यात सर्वत्र रंगू लागली आहे.

कसबा विधानसभेची पोटनिवडणूक महाविकास आघाडी व भारतीय जनता पार्टीसाठी प्रतिष्ठेची मानली जाते. कसब्यातून महाविकास आघाडीकडून रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी दिली. तर भारतीय जनता पार्टी कडून हेमंत रासने यांना उमेदवारी दिली आहे. मात्र रवींद्र धंगेकर यांचं मूळ गाव दौंड तालुक्यातील नाथाचीवाडी (पिंपळगाव) हे असून त्यांची वडीलोपार्जित शेत जमीन व घर देखील तेथे आहे. त्यांचं मूळ आडनाव हे झाडगे असून त्यांचे वडील हेमराज हे पुण्यात धंगेकर कुटुंबात दत्तक गेले आहेत. हेमराज हे सोने चांदीचे कारागीर म्हणून ओळखले जातात. व्यवसाय वाढवत असताना पुत्र रवींद्र धंगेकर यांचे शिक्षण आठवीपर्यंत झाले. ते स्वतः देखील सोने-चांदीच्या कारागिरीचा व्यवसाय करत आहेत. व्यवसाया बरोबर राजकारणात येऊन सामाजिक कार्य करण्याची त्यांना आवड निर्माण झाली. नगरसेवक पदावर असताना आपल्या मूळ गावातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आहेत.दौंड तालुक्यातील नाथाचीवाडी या गावात त्यांनी विविध विकास कामांना निधी मिळवून दिला असून गावच्या विविध कार्यक्रमात ते सहभागी होतं असतात.

Google Ad

महाविकास आघाडी कडून कसब्याच्या पोटनिवडणुकीसाठी रवींद्र धगेकर यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नाथाचीवाडी या गावात जल्लोष करण्यात आला. प्रचाराच्या पहिल्या दिवसापासून ते अखेरच्या दिवसापर्यंत नाथाचीवाडीतील ग्रामस्थ कसब्यात तळ ठोकून होते. कसब्याच्या निवडणुकीची चर्चा दौंड तालुक्यात सुरु असून दौंड तालुक्यात भाजपचे राहुल कुल हे विद्यमान आमदार आहेत. रवींद्र धंगेकर यांच्या रूपाने तालुक्याला दुसरा आमदार मिळणार का? याची चर्चा तालुक्यातील प्रत्येक गावाच्या पारा-पारावर रंगू लागली आहे.

Google Ad

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!