पिंपरी चिंचवड महानगरपालिका सर्व कार्यालयांतील दिव्यागांसह अधिकारी कर्मचा – यांची दैनंदिन उपस्थिती आता १०० टक्के

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. १० जून २०२१) : कोरोना” विषाणू प्रसारावरील प्रतिबंधात्मक उपाय अंतर्गत महानगरपालिका कार्यालयांतील अधिकारी आणि कर्मचारी यांच्या उपस्थितीवर मर्यादित कालावधीसाठी घातलेले निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. याबाबत आयुक्त राजेश पाटील यांनी आज आदेश निर्गमित केले असून पिंपरी चिंचवड महानगरपालिका सर्व कार्यालयांतील अधिकारी कर्मचा-यांची तसेच दिव्यांग अधिकारी कर्मचा-यांची दैनंदिन उपस्थिती १०० टक्के ठेवण्यास मान्यता दिली आहे.

सदर सूचना हया सर्व महानगरपालिका अधिनस्त कार्यालयांना लागू राहतील. ‘कोरोना’ विषाणूंचा प्रसार महानगरपालिका कार्यालयांमध्ये होऊ नये तसेच महानगरपालिका अधिकारी कर्मचारी यांना त्याचा संसर्ग होऊ नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून शासन आदेशानुसार मर्यादित कालावधीसाठी महानगरपालिका कार्यालयांतील कर्मचा-यांची उपस्थिती ५० टक्के करण्याबाबत आदेश देण्यात आले होते.

‘कोरोना’ विषाणू महामारीचा प्रसार रोखण्यासाठी महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभाग, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, मंत्रालय, मुंबई यांनी दिनांक ४ जून, २०२१ चे आदेशान्वये आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, २००५ द्वारे सुधारित मार्गदर्शक तत्त्वे प्रसारित केलेली आहेत. त्यानुसार कोविड१९ चा सरासरी संक्रमणाचा दर व ऑक्सिजन बेड ऑक्युपेन्सी विचारात घेवून पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रामधील सर्व अत्यावश्यक सेवा व कोविड१९ व्यवस्थापनाशी संबंधित शासकीय कार्यालये १०० टक्के क्षमतेने सुरु ठेवण्याबाबत निर्देश प्राप्त आहेत.

या बाबी विचारात घेवून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील सर्व कार्यालयांतील अधिकारी कर्मचा-यांची तसेच दिव्यांग अधिकारी कर्मचा-यांची दैनंदिन उपस्थिती १०० टक्के ठेवण्याचे आदेश आयुक्त पाटील यांनी दिले. या आदेशाची अंमलबजावणी तात्काळ लागू करण्यात यावी असे आदेशात नमुद केले आहे.

Maharashtra14 News

Recent Posts

रोहित पवारांचा अजित पवारांवर निशाणा … अजित दादा तुमच्यात जर धाडस असेल तर ….

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०४ मे) : बारामती लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या…

1 day ago

तुमच्या इथे कोणाविरुद्ध कोण? जाणून घ्या, … पहा, महाराष्ट्रातील सर्व 48 मतदारसंघातील उमेदवारांची यादी!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ मे) : महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 47 जागांवरील लढती कशा असतील हे…

3 days ago

अंध दिव्यांग नागरिकांना ब्रेल लिपीतील व्होटर स्लिपचे वाटप

महाराष्ट्र14 न्यूज, (दि.०२ मे) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मा.निवडणूक…

4 days ago

दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप व आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ मे) : दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप…

4 days ago

‘जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली, तर पुन्हा माझ्याकडे पायरी चढायची नाही … नेत्याने दिला कार्यकर्त्याना दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…

1 week ago