Categories: Uncategorized

घटस्फोटाला जबाबदार असल्याच्या संशयातून जन्मदात्या आईचा कोयत्याने गळा कापून मुलानं केला खून

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.११ फेब्रुवारी( : पुण्यात गुन्हेगारीला उधाण आले आहे. औंध येथे आर्थिक वादातून मित्रावर गोळीबार करून आरोपीने आत्महत्या केल्याची घटना ताजी असतांना पोटच्या मुलाने आपल्या जन्मदात्या आईचा खून केल्याने खळबळ उडाली आहे.

ही घटना खडकी येथे घडली आहे. आरोपी मुलाने घटस्फोटाला आई जबाबदार असल्याच्या संशयातून कोयत्याने तिचा गळा कापून खून करून फरार झाला. पोलिसांनी आरोपी मुलाला शिर्डी येथून अटक केली आहे.

गुंफाबाई शंकर पवार (वय ५५, रा. श्रीरामपूर, जि.अहमदनगर) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तर ज्ञानेश्वर शंकर पवार (वय २९, रा. खडकी) असे आरोपी मुलाचे नाव आहे. पोलिसांनी त्याला शिर्डीतून अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुंफाबाई मूळच्या श्रीरामपूर परिसरातील मुठे वडगावातील रहिवासी आहेत. त्यांना दोन मुले आहेत. ज्ञानेश्वर खडकीत राहायला असून, तो दारूगोळा कारखान्यात कामाला आहे. तर दुसरा मुलगा देहूरोड परिसरात राहायला आहे. शनिवारी त्या मुलांना भेटण्यासाठी पुण्यात आल्या होत्या. ज्ञानेश्वरचा घटस्फोट झाला आहे. तो एकटाच राहायला आहे. घटस्फोटाला आई जबाबदार असल्याचे त्याला त्याला वाटत होते. या संशयाचे भूत त्याच्या डोक्यात होते. दरम्यान, शनिवारी मध्यरात्री गुंफाबाई या झोपल्या होत्या. ही संधि साधून आरोपी मुलाने कोयत्याच्या साह्याने त्यांचा खून केला. त्यानंतर आरोपी मुलगा घराला कुलुप लावून फरार झाला.

रविवारी सकाळी गुंफाबाईच्या नातेवाईकांनी त्यांच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. मात्र, त्यांनी फोन उचलला नाही. यामुळे त्यांनी देहूरोड परिसरात राहणाऱ्या ज्ञानेश्वरच्या भावाशी संपर्क साधला. त्यानंतर ज्ञानेश्वरचा भाऊ रविवारी सकाळी खडकीतील त्याच्या भावाच्या घरी गेला. यावेळी त्याच्या घराला कुलूप दिसले. तर आईची चप्पल घराबाहेर दिसल्याने त्याचा संशय बळावला. त्याने खिडकीतून पहिले असता, आई रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसले.

Maharashtra14 News

Recent Posts

मोशीत वादळी वाऱ्यासह पाऊसामुळे “या” ठिकाणी ; भलं मोठं लोखंडी होर्डिंग कोसळलं

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.1६ मे ) : पिंपरी चिंचवड शहरातील मोशी, डुडळगाव, चऱ्होली परिसरात सोसाट्याच्या…

3 days ago

चिंचवड ठरविणार मावळच्या विजयाची गणिते, … ४ जूनला कोणती शिवसेनेचा गाठणार दिल्ली? ?

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ मे) : लोकसभेचे मतदान पार पडल्यानंतर आता मावळ विधानसभा मतदारसंघात मताधिक्य…

4 days ago

नवी सांगवीत या शाळेत झाले बोगस मतदान … तर, मोबाईल बंदी मुळे अनेक मतदार गेले माघारी … पोलिस आणि मतदारांमध्ये हुज्जत

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. १३) मतदान झाले. सकाळी…

5 days ago

भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी मानले मावळ आणि शिरूर च्या मतदारांचे आभार, असे झाली मतदानाची टक्केवारी:

महाराष्ट्र 24 न्यूज, (दि.१३ मे) : आज (दि.१३ मे) पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर आणि पुणे…

6 days ago

नवी सांगवीत मतदानाला शांततेत सुरवात; बा रा घोलप महाविद्यालयात सकाळपासूनच मतदान केंद्रांवर रांगा, कंट्रोल रुमद्वारे प्रशासनाचे लक्ष

wमहाराष्ट्र व14 न्यूज, (दि.१३ मे) : पिंपरी चिंचवड शहरात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी…

6 days ago

अजित पवारांचा निलशे लंके यांना थेट इशारा … अरे, “बेटो तू ज्या शाळेमध्ये शिकतोयस त्या शाळेचा हेडमास्टर अजित पवार आहे”!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगरमध्ये…

1 week ago