Google Ad
Uncategorized

सांगवीच्या शितोळे शाळेत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सांगता उत्साहात साजरी

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ ऑगस्ट) :- छत्रपती शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कै. सौ. शकुंतलाबाई आनंदराव शितोळे प्राथमिक विद्यामंदिर, शिशिविहर,नूतन माध्यमिक विद्यालय, मॉडर्न नर्सरी, श्रीमती सुंदरबाई भानसिंग पूजा गुरु गोविंद इंग्लिश मीडियम स्कूल सांगवी या शाळेत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाची सांगता उत्साह साजरा झाली. सकाळी सात वाजता सांगवी परिसरातून भव्य अशी प्रभात फेरी काढण्यात आली यामध्ये हर घर तिरंगा, घर घर तिरंगा हा संदेश विद्यार्थ्यांनी दिला.

सर्व विद्यार्थ्यांनी वेशभूषा करून देशाबद्दलची आत्मीयता, तिरंग्या बद्दलचे राष्ट्रप्रेम दाखवले. प्रत्येकाला तिरंग्याचे महत्व, तिरंग्याचे आचारसंहिता विद्यार्थ्यांनी लोकांना सांगितले .शाळेच्या मैदानावर क्रांतिकारक राजगुरू यांचे वंशज मा. प्रशांत राजगुरू चौधरीसाहेब यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले संस्थेचे अध्यक्ष आबासाहेब जंगले यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न झाला. कॉन्सन्ट्रिक्स कंपनीचे अधिकारी मा. विक्रांत पांडे व इतर अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली सर्व कंपनी कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने शाळेतील गोरगरीब होतकरू विद्यार्थी व विद्यार्थिनींना दत्तक घेऊन एकूण तीस विद्यार्थ्यांची 90 हजार रुपये फी भरली व सर्व विद्यार्थ्यांना संपूर्ण खाऊवाटप करण्यात आले.

Google Ad

यावेळी मा.प्रशांत राजगुरू,संस्थेचे अध्यक्ष मा. आबासाहेब जंगले, कार्याध्यक्ष प्रशांतजी शितोळे, उपाध्यक्ष सतीश साठे,सचिव तुळशीराम नवले, खजिनदार रामभाऊ खोडदे, माजी महापौर उषा उर्फ माई ढोरे, शारदाताई सोनवणे, हर्षल ढोरे, सुषमा तनपुरे, विलास थोरवत, माजी सैनिक हनुमंत नलवडे,सातारा मित्र मंडळाचे कार्याध्यक्ष संजय चव्हाण मुख्याध्यापक शिवाजीराव माने ,इंग्रजी माध्यम प्रमुख शोभा वरती, माध्यमिक प्रमुख शितल शितोळे, शिशुविहार प्रमुख संगीता सूर्यवंशी, नर्सरी प्रमुख शितल गरसुंड, उपस्थित होते .कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी दत्तात्रय जगताप, स्वप्निल कदम, सुनिता टेकवडे, सीमा पाटील, हेमलता नवले ,मनीषा लाड, पांचशिला वाघमारे,श्रद्धा जाधव, दिपाली झणझणे , भारती घोरपडे, स्वाती कुलकर्णी, संध्या पुरोहित, गायत्री कोकाटे, नीता ढमाले, निर्मला भोईटे ,मनीषा गायकवाड, कुसुम ढमाले, चेतना इंगळे ,रोहिणी सावंत सर्व इंग्रजी माध्यम शिक्षक वृंद यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक शिवाजी माने यांनी व आभार दत्तात्रय जगताप यांनी केले.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!