महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. १५ ऑगस्ट २३) : नवी सांगवी येथील प्रतिभा महिला प्रतिष्ठान संचलित, द न्यू मिलेनियम इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या संयुक्त विद्यमाने ७७ वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा झाला.
अशा या अमृत महोत्सवाची सांगता व ७७ व्या स्वातंत्र्य दिनाला अध्यक्ष म्हणून चिंचवड विधानसभा च्या विद्यमान आमदार श्रीमती अश्विनीताई लक्ष्मणभाऊ जगताप (एमएलए भारतीय जनता पक्ष) संस्थेचे सचिव मा.शंकर जगताप उपस्थित होते. तर प्रमुख पाहुण्या म्हणून श्रीमती डॉ. रेखा दुबे, (सीईओ, आदित्य बिर्ला हॉस्पिटल पिंपरी) उपस्थित होत्या. व संचालक मंडळातील सदस्य इतर मान्यवर पदाधिकाऱ्यांनीही पाहुणे म्हणून उपस्थिती दर्शवली. दीपप्रज्वलाने कार्यक्रमास सुरुवात करून ध्वजारोहणास सलामी देण्यात आली. परेडच्या माध्यमातून ध्वजासोबतच सर्व प्रमुख पाहुण्यांना मानवंदना देऊन सर्वांचे स्वागत करण्यात आले.
स्कूलध्वजारोहनास सलामी देण्यात आली. नंतर विद्यार्थ्यांनी मार्शल तलवार बाजी,लाठी काठी,असेल किवा विविध नृत्य असेल , गायन यातून विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शन घडविले. विविध वेशभूषा करून सर्वच छोट्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीचे दर्शन घडविले. स्वातंत्रदिवसाचे महत्त्व अध्यक्षांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले .स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ज्यांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले ते व्यर्थ गेलेले नाही.यासाठी विविध उपक्रमतून स्पष्ट केले. राष्ट्रभक्तीशी संबंधित सर्वच मूल्ये जोपासले जातील अशी ग्वाही देण्यात आली. तर प्रमुख पाहुण्यांनी सर्वांगीण विकास हेच आपले ध्येय,उद्दिष्ट ठेवून सर्वांनी समर्पित होणे, कसे गरजेचे आहे, हे आपल्या भाषणातून स्पष्ट केले.
अशा या प्रेरणादायी कार्यक्रमासाठी चिंचवड विधानसभेच्या आमदार श्रीमती अश्विनीताई जगताप, उपाध्यक्ष विजू अण्णा जगताप, सचिव मा. शंकरभाऊ जगताप, प्रा.बामणे, सूर्यकांत गोफणे , स्वाती पवार तसेच सर्व स्तरातील मान्यवर, माजी नगरसेवक, कॉलेजच्या प्राचार्या इनायत मुजावर ,प्रायमरी मुख्याध्यापिका जयश्री माळी व सर्व शिक्षक वृंद पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.या कार्यक्रमाचे सूत्रंचालन पंकजा पाचरणे यांनी केले तर आभार अनुष्का हिने मानले.
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.16 सप्टेंबर :- वेंगुर्ला आणि एकूण कोकण तसं पहायला गेले तर सुंदरच…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.13 सप्टेंबर :- पिंपरी चिंचवड शहर स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करत असताना,…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.13 सप्टेंबर :- पिंपरी चिंचवड शहरातील अकुर्डीमध्ये रात्रीची वेळ असताना एका निष्पाप…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.13 सप्टेंबर) : पिंपरी चिंचवड शहरातील सहकार क्षेत्रात अग्रेसर असलेल्या श्रीगणेश सहकारी…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.11 सप्टेंबर : विमान वाहतुकीत करिअर करायचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी सुवर्णसंधी. यंग…
जिल्हा डॉजबॉल स्पर्धेत एच. ए. स्कूलचा डंका; दोन विजेतेपदावर नाव कोरलं पिंपरीत जिल्हा डॉजबॉल स्पर्धा…