Categories: Uncategorized

राष्ट्रपती पदक जाहीर झाल्याबद्दल पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांचे शहर भाजपकडून अभिनंदन

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. १४ ऑगस्ट) : पिंपरी चिंचवड शहर पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांना राष्ट्रपती पदक जाहीर झाल्याबद्दल पिंपरी-चिंचवड शहर भारतीय जनता पक्षाच्या वतीने शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी त्यांचेे अभिनंदन केले आहे.

याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात जगताप यांनी म्हटले आहे की, पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांची राष्ट्रपती पदकासाठी निवड झाली ही अत्यंत आनंदाची बाब आहे. आपल्या शहराच्या आयुक्तांना हा सन्मान प्राप्त होत असल्याने ही बाब शहरासाठीही अभिमानास्पद आहे. पिंपरी-चिंचवडचे आयुक्त या नात्याने विनय कुमार चौबे यांनी शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जागरुकपणे प्रयत्न केले. गैरकृत्यांवर वचक निर्माण करताना सर्वसामान्य नागरिकांशी आपुलकीचा संवाद निर्माण केला.

तसेच, शहरातील पोलिस अधिकारी, कर्मचार्‍यांना विश्वासात घेऊन पोलिस दलाला जास्तीत जास्त जनताभिमुख करण्यासाठी त्यांचे प्रयत्न सातत्याने सुरु असतात. त्या प्रयत्नांसह त्यांच्या पुढील कारकिर्दीला या सन्मानाने निश्चित बळ मिळणार आहे. राष्ट्रपती पदकाने सन्मान होणे ही कोणत्याही पोलिस अधिकार्यासाठी अत्यंत सन्मानाची, आनंदाची बाब. तो सन्मान, आनंद पोलिस आयुक्त चौबे यांना लाभला आहे. पोलिस दलात त्यांनी दाखवलेल्या कर्तबगारीबद्दल त्यांना हा गौरव प्राप्त होत आहे. यापुढील काळातही त्यांच्याकडून अशाच प्रकारची कर्तबगारी पार पडून जनतेला दिलासा देणारे कार्य घडावे, अशीही अपेक्षा जगताप यांनी व्यक्त करुन पोेलिस आयुक्तांना शुभेच्छा दिल्या आहेत.

Maharashtra14 News

Recent Posts

ब्रेकिंग न्यूज | वाकड वाहतूक पोलिसांची धडाकेबाज कारवाई! व्हायरल रीलमधील फॉर्च्युनर मालकावर अखेर गुन्हा दाखल!

ब्रेकिंग न्यूज | वाकड वाहतूक पोलिसांची धडाकेबाज कारवाई! व्हायरल रीलमधील फॉर्च्युनर मालकावर अखेर गुन्हा दाखल!…

1 week ago

जिल्हा रुग्णालयाच्या २०० खाटांच्या सुपरस्पेशालिटी सेवेला ‘प्रगती’ प्रकल्पांतर्गत मंत्रिमंडळाची मंजुरी ” – आमदार शंकर जगताप

जिल्हा रुग्णालयाच्या २०० खाटांच्या सुपरस्पेशालिटी सेवेला 'प्रगती' प्रकल्पांतर्गत मंत्रिमंडळाची मंजुरी " - आमदार शंकर जगताप…

1 week ago

जिल्हा रुग्णालयातून ‘सुपर स्पेशालिटी’ आरोग्यसेवेचे नवे पर्व, … जिल्ह्यातून येणाऱ्या रुग्णांना ठरणार वरदान- आमदार शंकर जगताप

महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी चिंचवड  २४ ऑगस्ट (प्रतिनिधी):  जिल्हा रुग्णालयाचा विस्तार करून ते अत्याधुनिक सुपर…

4 weeks ago

वाकड येथील काळाखडक परिसरात स्कूल बसला आग … अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठी दुर्घटना टळली

महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, दि. २० ऑगस्ट २०२६:* पिंपरी चिंचवड शहरातील वाकड परिसरातील काळाखडक, भूमकर…

4 weeks ago

“खड्डा दिसला तर फोटो काढा, ठिकाण नोंदवा” … पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने आतापर्यंत २,२४७ पैकी १,७३३ खड्डे बुजविले; उर्वरित खड्डे बुजविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू

  महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, दि. १७ ऑगस्ट २०२६ :* पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या स्थापत्य विभागाच्या अहवालानुसार,…

1 month ago