महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१६ फेब्रुवारी) : खासदार गिरीश बापट यांच्या प्रकृतीची चौकशी केल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तब्बल ३ तास अनेकांच्या भेटीगाठी घेतल्या. त्यात उद्योजक तसेच श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे उत्सवप्रमुख पुनीत बालन यांचाही समावेश होता. कसबा विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या या भेटीची चांगलीच चर्चा रंगली आहे.
सावरकर स्मारक समितीच्या बैठकीसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बुधवारी सायंकाळी पुण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी खासदार गिरीश बापट यांची भेट घेतली. कसबा पोटनिवडणुकीच्या प्रचारात सध्या रंग भरण्यास सुरुवात झाली आहे. ही निवडणूक फडणवीस यांनी गांभीर्याने घेतली आहे. खासदार बापट यांच्या भेटीनंतर ते आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या घरी आले. तेथे त्यांनी पुण्यातील गणेश उत्सव मंडळांचे आधारस्तंभ पुनीत बालन यांची भेट घेतली. शहरातील विविध प्रश्नांवर फडणवीस आणि बालन यांच्यात २० मिनिटे प्रदीर्घ चर्चा झाली.
कसबा मतदारसंघातील दीडशेहून अधिक गणेश मंडळांना पुनीत बालन ग्रुपच्या माध्यमातून मोठी आर्थिक मदत करण्यात आली होती. या मदतीमुळे कोरोनाच्या साथीनंतरचा गणेशोत्सव मंडळांना चांगल्या पद्धतीने साजरा करता येऊ शकले होता. यामुळे गणेश मंडळाचे कार्यकर्ते बालन यांच्याशी व्यक्तीशी जोडली गेलेली आहेत. याच पार्श्वभूमीवर फडणवीस आणि बालन यांच्यात चर्चा झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याबाबत बालन यांच्याशी संपर्क केला असता होऊ शकला नाही.
कसबा मतदारसंघातील महत्त्वाच्या असलेल्या सराफ असोशिएशनचे अध्यक्ष ॲड. फत्तेचंद्र रांका यांचीही देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर त्यांनी भाजपच्या प्रमुख कार्यकर्त्यांची रात्री उशिरा बैठक घेतली. जवळपास ३ तास देवेंद्र फडणवीस यांनी वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांच्या गाठीभेटी घेतल्या. त्यामुळे भाजपने आणि स्वत: देवेंद्र फडणवीस यांनी कसबा पोटनिवडणुकीत कोणताही दगाफटका होऊ नये, यासाठी काळजी घेतली जात असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जाऊ लागले आहे.
महाराष्ट्र 14 न्यूज, दिनांक 10 ऑगस्ट : देवाग कोष्टी समाज पुणे या संस्थेच्या विश्वस्तपदाचा मागील…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.09 ऑगस्ट : हिंजवडीतील राजीव गांधी इन्फोटेक पार्कमधील स्थानिक ग्रामपंचायतींनी गावठाणाच्या हद्दीत…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. 08 ऑगस्ट :- रक्षाबंधनाचा सण म्हणजे बहीण-भावाच्या प्रेमाचे प्रतीक. यंदाचा रक्षाबंधन…
महाराष्ट्र 14 न्यूज, ७ ऑगस्ट - महापालिका प्रशासनाने देखील नागरिकांच्या समस्या समजून घेत त्या प्रभावीपणे…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.07ऑगस्ट :- एम .जी देवकर एज्युकेशनल ट्रस्ट संचलित ब्रिलियंट स्टार प्री स्कूल…
महाराष्ट्र 14 न्यूज पिंपरी, ७ ऑगस्ट, २०२५ :* पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या ताफ्यात एक…