महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. १२ ऑगस्ट) :
सध्याच्या धकाधकीच्या जीवनशैलीमुळे आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे. दैनंदीन गरजा भागवण्यासाठी जीवाचे राण करावे लागत असल्यामुळे तणाव वाढत चालला आहे. ऐन तिशीत तरुणांना असह्य आजार जडू लागले आहेत. यावर वेळीच उपाय शोधून जीवघेण्या अजारातून स्वतःला मुक्त करण्यासाठी आरोग्य शिबिर घेऊन समाजाप्रती बांधिलकी जपण्याचे काम उन्नतीच्या माध्यमातून सुरु आहे, त्याचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन उन्नती सोशल फाऊंडेशनच्या अध्यक्षा तथा भाजपा महिला मोर्चा चिंचवड विधानसभा अध्यक्षा सौ. कुंदाताई संजय भिसे यांनी केले.
स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून पिंपळे सौदागर येथील उन्नती सोशल फाऊंडेशन, मा. चंद्रकांतदादा पाटील समर्थ युवा फाऊंडेशन व बघतोय रिक्षावाला फोरम यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन अध्यक्षा सौ. कुंदाताई संजय भिसे व डॉ. केशव क्षीरसागर यांच्या हस्ते शनिवारी (दि. 12) सकाळी झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या. हे शिबिर पिंपळे सौदागर येथील उन्नती सोशल फाऊंडेशन कार्यालय याठिकाणी शनिवारी सकाळी दहा ते सायंकाळी सहा या वेळेत करण्यात आले. व शिबिराचा लाभ 217 लोकांनी घेतला.
यावेळी डॉ. केशव क्षीरसागर, संस्थापक श्री संजय भिसे, मनोज ब्राह्मणकर,रविंद्र पाटिल, उदय डांगे, मोहन बामणे, पराजी शिंगाडे, जेतलाल जाधव, अर्जुन उपळे, रमेश जाधव, सुनील लवटे, लक्ष्मण जाधव, दत्ता लोकरे, रमेश दुकळे, अनिल गीते, दीपक बनसोडेबघतो रिक्षावाला फोरम महाराष्ट्र सचिव. संतोष उबाळे. पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष संतोष भोसले. गोपाल बांदल. उपाध्यक्ष मुन्ना पठाण. उपाध्यक्ष महेश लंकेश्वर. विकास वाघमारे. पिंपरी चिंचवड शहर संघटक रवी जगताप. पिंटू हनवते. मनीष सावंत. नजर सौदागर. देवेंद्र शिंदे. सोमनाथ सातपुते. प्रमोद नाईक नवरे. विशाल देठे,शांताराम बैसाने, अविनाश गोसावी आदी उपस्थित होते.
या शिबिरात रक्त तपासणी, रक्तातील साखर, कोलेस्ट्रॉल, ब्लड काऊंट, रक्त दाब, छातीचा एक्सरे, तोंडाचा कर्करोग, स्तनांचा कर्करोग, गर्भाशयाचा कर्करोग अशा अंदाजे 10 हजार रुपये खर्चाच्या तपासण्या पूर्णपणे मोफत केल्या जात आहेत. पिंपळे सौदागर परिसरासह शहरातील रिक्षाचालक व नागरिकांनी या शिबिरात सहभाग घेऊन आरोग्य तपासणी करावी. उन्नतीच्या माध्यमातून पिंपळे सौदागर परिसरातील नागरिकांसाठी वेळोवेळी सामाजिक उपक्रम घेतले जातात. त्याचा असंख्य गरजू नागरिकांना फायदा होता आहे, ही आनंदाची बाब आहे, अशीही भावना सौ. कुंदाताई भिसे यांनी व्यक्त केली.व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उन्नती सोशल फाउंडेशनचे सल्लागार सागर बिरारी यांनी केले.