Google Ad
Uncategorized

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा रुबी हॉल ते वनाज दरम्यान पुणे मेट्रोने प्रवास

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१२ ऑगस्ट) : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मेट्रो कामाचा आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी शिवाजीनगर- हिंजवडी- माण मेट्रोच्या कामाचा आढावा घेतला. ते म्हणाले की, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मार्गावरील वाहतूक कोंडीवर तात्काळ उपाययोजना कराव्यात. त्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकात प्रस्तावित मेट्रोसह एकात्मिक दुमजली उड्डाणपुलाच्या कामाला गती देतानाच शिवाजीनगर- हिंजवडी- माण मेट्रोच्या कामाचा वेग वाढवावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्यावतीने उभारण्यात येत असलेल्या शिवाजीनगर- हिंजवडी- माण मेट्रोच्या कामाला गती देण्याच्यादृष्टीने प्रकल्पासाठी आवश्यक शासकीय जागा, खासगी जागांबाबत सर्व यंत्रणांनी समन्वयाने आणि गतीने काम करावे. नागरिकांना वाहतूक कोंडीचा त्रास होऊ नये यासाठी महानगरपालिका तसेच वाहतूक पोलीसांनी समन्वयाने वाहतुकीचे नियोजन करावे.

Google Ad

आज कार्यक्रमासाठी पुण्यात आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सकाळी रुबी हॉल ते वनाज दरम्यान पुणे मेट्रोने प्रवास केला. यावेळी त्यांनी प्रवासी नागरिकांशी संवाद साधला. तसेच प्रकल्पासाठी आवश्यक शासकीय जागा ताब्यात घेण्याच्यादृष्टीने उशीर लागता कामा नये, असे निर्देश देतानाच उपमुख्यमंत्री पवार यांनी संबंधित जागांशी निगडित प्रमुख अधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनीवरुन थेट संपर्क साधत सूचना केल्या. तसेच खासगी जागांबाबतही जागामालकांशी दूरध्वनीवरुन चर्चा केली. भविष्यातील 50 वर्षांचा विचार करुन प्रकल्पाच्या आराखड्यात तडजोड होता कामा नये, असेही उपमुख्यमंत्री म्हणाले. यावेळी या प्रकल्पांतर्गत सुरू असलेले पाईलिंग, कास्टिंग या कामाचा तसेच समस्यांचा आढावा उपमुख्यमंत्री पवार यांनी घेतला.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!