Google Ad
Uncategorized

नवी सांगवी परिसरात स्वच्छ तीर्थ अभियान … श्री महालक्ष्मी मंदिरात भक्तांच्या वतीने स्वच्छता मोहीम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१९ जानेवारी) : अयोध्येत २२ जानेवारीला होणाऱ्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यासाठी संपू्र्ण देशभर उत्साहाचं वातावरण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे. अयोध्येमध्ये २२ जानेवारीला प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा होणार आहे. या पार्श्वभूमीवर धार्मिक स्थळे व तेथील परिसरात स्वच्छता अभियान राबविण्याचे आदेश भारत सरकारच्या आवासन आणि शहरी कार्य मंत्रालयाच्या वतीने महापालिकेला दिले आहेत. यात नागरिकांचा सहभाग ही मोठा आहे.

त्यानुसार पिंपरी चिंचवड शहरातील ५३ मंदिरात स्वच्छता मोहिम घेण्यात आली आहे. राज्यातील मंदिरे आणि परिसर स्वच्छता मोहिम राबविण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निर्देशही दिले आहेत. त्यानुसार एक हिंदू म्हणून मंदिर आणि परिसर स्वच्छता हे आपलेही कर्तव्य समजून नवी सांगवी येथील श्री महालक्ष्मी मंदिरात भक्तांच्या वतीने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली, यात मंदिर आणि कळस पाण्याने स्वच्छ धुवून काढण्यात आला, यात मंदिर कमिटीचे सदस्यांनी तसेच नागरिकांनी आपला सहभाग नोंदविल्याचे दिसून आले. तसेच मंदिरास विद्युत रोषणाई ने सजविण्यात आले आहे.

Google Ad

केंद्र सरकारच्या “स्वच्छ भारत अभियान” अंतर्गत पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीनेही “स्वच्छ तीर्थ अभियान” राबविण्यास सुरूवात केली आहे. या अंतर्गत २१ जानेवारीपर्यंत शहरातील सुमारे ५३ मंदिरांमध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे.

Ad3
ad2
ad1
Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!