दापोडीतील सी एम ई गेट समोरील पादचारी मार्गावर ओपन जिम सुरू करण्याची सुप्रिया साळवे आणि अस्मिता कांबळे यांनी केली मागणी!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२७मे) : कोरणाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची प्रतिकार शक्ती वाढावी या भावनेतून दापोडी येथील सी एम ई गेट समोरील पदपथावर ओपन जिम सुरू करावी अशी मागणी असलेले निवेदन राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सुप्रिया साळवे (काटे) आणि अस्मिता कांबळे (मोरे) यांनी पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त राजेश पाटील, महापौर माई ढोरे, आणि उपमहापौर हिराबाई (नानी) घुले यांना दिले आहे.

या निवेदनात सुप्रिया साळवे आणि अस्मिता कांबळे यांनी म्हटले आहे की, दापोडी प्रभाग क्रं.३० या प्रभागाची लोकसंख्या पाहता आणि खाजगी जिमची वाढलेली फी पाहता ती सामान्य नागरिकांना परवडणारी नाही. दापोडी भागात सर्वसामान्य नागरिक राहतात कोरोनाच्या या महामारीत अगोदरच हाताला काम नाही त्यामुळे नागरिक आर्थिक विवंचनेत आपले कुटुंब चालवत आहेत.

तसेच याकाळात आरोग्यासाठी व्यायाम करण्याची गरज आहे, परंतु पैशाअभावी खाजगी जिम सुरू झाल्यानंतर त्या ठिकाणी जाणे, या नागरिकांना परवडणारे नसल्याने CME गेट समोर असलेल्या पादचारी मार्गावर ओपन जिम सुरू करावी म्हणजे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना ती फायदेशीर ठरू शकते. अशी मागणी निवेदनात सुप्रिया साळवे आणि अस्मिता कांबळे यांनी केली आहे.

Maharashtra14 News

Recent Posts

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने ५ अनधिकृत जाहिरात फलकांवर निष्कासनाची कारवाई

महाराष्ट्र 24 न्यूज, दि. २० मे २०२४ - पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने शहरातील अनधिकृत जाहिरात…

13 hours ago

उद्या दुपारी एक वाजता बारावीचा निकाल जाहीर होणार, विध्यार्थ्यांना आणि पालकांना निकालाची उत्सुकता

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२० मे) : महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक मंडळाच्यावतीनं (MSBSHSE) बारावीच्या परीक्षेच्या निकालाची…

15 hours ago

मोशीत वादळी वाऱ्यासह पाऊसामुळे “या” ठिकाणी ; भलं मोठं लोखंडी होर्डिंग कोसळलं

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.1६ मे ) : पिंपरी चिंचवड शहरातील मोशी, डुडळगाव, चऱ्होली परिसरात सोसाट्याच्या…

5 days ago

चिंचवड ठरविणार मावळच्या विजयाची गणिते, … ४ जूनला कोणती शिवसेनेचा गाठणार दिल्ली? ?

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ मे) : लोकसभेचे मतदान पार पडल्यानंतर आता मावळ विधानसभा मतदारसंघात मताधिक्य…

6 days ago

नवी सांगवीत या शाळेत झाले बोगस मतदान … तर, मोबाईल बंदी मुळे अनेक मतदार गेले माघारी … पोलिस आणि मतदारांमध्ये हुज्जत

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. १३) मतदान झाले. सकाळी…

1 week ago

भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी मानले मावळ आणि शिरूर च्या मतदारांचे आभार, असे झाली मतदानाची टक्केवारी:

महाराष्ट्र 24 न्यूज, (दि.१३ मे) : आज (दि.१३ मे) पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर आणि पुणे…

1 week ago