महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२० मे) : राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) अर्बन महिला सेलच्यावतीने महाराष्ट्र प्रदेश अर्बन सेल मा.प्रदेशाध्यक्षा खासदार अॅड.सौ.वंदनाताई चव्हाण यांच्या आदेशान्वये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) शहराध्यक्ष श्री.अजितभाऊ गव्हाणे यांचे मार्गदर्शनाखाली मा. आयुक्ता साहेब, पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांना पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील बेवारसी-मोकाट श्वानांचा बंदोबस्त होणेबाबतचे निवेदन अर्बन सेल महिला अध्यक्षा मनिषा गटकळ यांच्या मार्फत देण्यात आले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वेगवेगळ्या परिसरात मध्ये मोकळ्या जागेत, रस्त्याच्या कडेला, ओव्हर ब्रिजखाली, बेवारसी मोकट श्वान टोळक्याने एकत्र बस्तात. येणाऱ्या जाणऱ्या नागरिकांवर जोरात भुंकत धावून जातात व चावतात, नागरिक स्वतःला वाचवताना मोठमोठे अपघात होतात त्यामुळे नागरिक गंभीर जखमी झालेले आहेत.
त्याचप्रमाणे जेष्ठ नागरिक सकाळी-संध्याकाळी वॉकिंगसाठी बाहेर पडतात, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी शाळे कॉलेज करीता जा ये करतात, महिला कामगार आणि कामगार कर्मचारी कामानिमित्त शहरांच्या विविध ठिकाणी ये जा करित असतात, तसेच इंडस्ट्रियल कंपन्यामध्ये कामगार वर्गाची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. हे कामगार सकाळी, दुपारी आणि रात्रपाळी अशे शिफ्ट मध्ये कामे करुन टु-व्हिलर किंवा वाहनाने ये जा करीत असतात अशा या कर्मचारी वर्गावर बेवारसी मोकाट श्वाने अंगावर धावून येतात व चावतात एकत्रीत हल्ले करतात त्यामुळे शहरावर भितीचे वातावरण झाले आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका ही आशिया खंडातील एकेकाळी श्रीमंत समजल्या जाणाऱ्या महानगपालिकेला राज्यापातळीवर व देशपातीळवर विविध पुरस्काराने सन्मानित केले असून स्मार्ट सिटी ने पुरस्कृत केले आहे तसेच जगातील नकाशावर एक आगळे वेगळे स्थान निर्माण केलेले असून या औद्योगिक नगरी शहरामध्ये असे अनुचित प्रकार घडणे निश्चितच आश्चर्य कारक गोष्ट आहे. यासदर्भात महानरगपालिकाने ठोस पाऊले उचलावीत यासाठी राष्ट्रवादी अर्बन सेल महिला अध्यक्षा सौ.मनिषा गटकळ यांनी निवेदनाची दखल घेऊन संपुर्ण शहरातील मोकाट श्वानंचा बंदोबस्त करावा, अशी विनंती आयुक्तांकडे केली असून जर लवकरात लवकर कारवाही झाली नाही तर आयुक्त कार्यालयात मोकाट श्वान सोडले जातील असा इशारा देखील अर्बन सेल महिला विभागाच्यावतीने देण्यात आला आहे.
यावेळी सौ.मनिषा किसन गटकळ अध्यक्षा-अर्बन सेल, सौ.लताताई ओव्हाळ माजी उपसभापती शिक्षण मंडळ तथा अर्बन सेल शहर निरीक्षक, विजयाताईं काटे अध्यक्षा-अर्बन सेल पिंपरी विधानसभा, अल्पसंख्यांक विभाग पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष युसूफ कुरेशी इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.