Mumbai : नवरात्रौत्सव संदर्भात राज्य सरकारनं जाहीर केली गाईडलाईन्स … यंदा गरबा नाहीच !

महाराष्ट्र 14 न्यूज : कोरोनामुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थिती लक्षात घेता यंदा नवरात्रौत्सव, दुर्गापूजा आणि दसरा सण कसा साजरा करावा, याबाबत राज्य सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. याबाबत राज्य सरकारना मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहे. सार्वजनिक नवरात्री उत्सव मूर्ती 4 फूटापेक्षा तर घरगुती 2 फूटापेक्षा मोठी नसावी, देवी मिरवणूक काढता येणार नाही, विसर्जन नियमावली पाळावी, मंडपस्थळी सॅनिटाझयरचा वापर करावा लागेल. दर्शन रांगेत सोशल डिस्टंसिंगचा नियम पाळावा लागेल, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

विशेष म्हणजे यंदा गरबा कार्यक्रमावर बंदी घालण्यात आली आहे. त्याचबरोबर धार्मिक कार्यक्रमांच गर्दी न करता आयोजन करावे. कोविड-19 संकट लक्षात घेता सोशल डिस्टंसिंगच्या नियमावलीचं पालन करावं, ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या सरकारच्या मोहिम प्रचार जनतेच्या हितासाठी करावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. दसऱ्याच्या दिवशी मात्र रावण दहन करता येणार आहे. मात्र, या कार्यक्रमाला गर्दी होणार नाही. सुरक्षित सामाजिक अंतर नियमावली पाळली जाणे गरजेचं असल्याचं म्हटलं आहे.

दरम्यान, कोरोनामुळे देशावर ओढवलेल्या संकटात अनलॉकचा चौथ्या टप्पा 30 सप्टेंबरला संपणार आहे. 1 ऑक्टोबरपासून अनलॉक-5 सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार अनलॉक-5 अंतर्गत दिल्या जाणाऱ्या सूट संदर्भात आज मार्गदर्शक सूचना जारी करण्याची शक्यता आहे. यंदा शक्यतो पारंपरिक देवीच्या मूर्तीऐवजी घरातील धातू, संगमरवर आदी मूर्तीचं पूजन करावं. मूर्ती शाडूची, पर्यावरण पूरक असल्यास तिचं विसर्जन शक्यतो घरच्या घरी करावे. विसर्जन घरी शक्य नसल्यास कृत्रीम विसर्जन स्थळी करण्य संदर्भात स्थानिक प्रशासनाशी समन्वय ठेवावा.

नवरात्रौत्सवासाठी वर्गणी, देणगी स्वेच्छेनं दिल्यास स्वीकार करावा. जाहिरातींच्या प्रदर्शनामुळे गर्दी आकर्षित होणार नाही, हे पाहावं. तसेच – देवीच्या दर्शनाची सुविधा ऑनलाईन, केबव नेटवर्क, वेबसाईट, फेसबुक आदीद्वारे उपलब्ध करून देण्यासाठी जास्तीत जास्त व्यवस्था करावी.

Maharashtra14 News

Recent Posts

मोशीत वादळी वाऱ्यासह पाऊसामुळे “या” ठिकाणी ; भलं मोठं लोखंडी होर्डिंग कोसळलं

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.1६ मे ) : पिंपरी चिंचवड शहरातील मोशी, डुडळगाव, चऱ्होली परिसरात सोसाट्याच्या…

3 days ago

चिंचवड ठरविणार मावळच्या विजयाची गणिते, … ४ जूनला कोणती शिवसेनेचा गाठणार दिल्ली? ?

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ मे) : लोकसभेचे मतदान पार पडल्यानंतर आता मावळ विधानसभा मतदारसंघात मताधिक्य…

4 days ago

नवी सांगवीत या शाळेत झाले बोगस मतदान … तर, मोबाईल बंदी मुळे अनेक मतदार गेले माघारी … पोलिस आणि मतदारांमध्ये हुज्जत

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. १३) मतदान झाले. सकाळी…

5 days ago

भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी मानले मावळ आणि शिरूर च्या मतदारांचे आभार, असे झाली मतदानाची टक्केवारी:

महाराष्ट्र 24 न्यूज, (दि.१३ मे) : आज (दि.१३ मे) पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर आणि पुणे…

6 days ago

नवी सांगवीत मतदानाला शांततेत सुरवात; बा रा घोलप महाविद्यालयात सकाळपासूनच मतदान केंद्रांवर रांगा, कंट्रोल रुमद्वारे प्रशासनाचे लक्ष

wमहाराष्ट्र व14 न्यूज, (दि.१३ मे) : पिंपरी चिंचवड शहरात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी…

6 days ago

अजित पवारांचा निलशे लंके यांना थेट इशारा … अरे, “बेटो तू ज्या शाळेमध्ये शिकतोयस त्या शाळेचा हेडमास्टर अजित पवार आहे”!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगरमध्ये…

1 week ago