Categories: Uncategorized

दत्तजयंती कीर्तन सोहळ्यानिमित्त कासारवाडीतील श्रीदत्तसाई सेवा कुंज आश्रम … पहिल्याच दिवशी भाविकांच्या मांदियाळीने फुलला

नामाचे चिंतन प्रगट पसारा! असाल ते करा जेथे तेथे !!

सोडवील माझा स्वामी निष्चयेसी ! प्रतिज्ञा हे दासी केली आम्ही!!

गुण दोष नाही पाहात कीर्तनी! प्रेमे चक्र पाणी वश्य होय !!

तुका म्हणे कडू वाटतो प्रपंच! रोकडे रोमांच कंठ दाटे !!

।। विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल ।।

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२० डिसेंबर) : मिती मार्गशीर्ष शुध्द शके १९४५,बुधवार दि. २०-१२-२०२२ ते २७-१२-२०२२ श्री दत्तजयंती निमित्ताने सुरू होत असलेल्या कीर्तन महोत्सवास प्रारंभ  सकाळी ९.०० वा. पद्मश्री गिरीशजी प्रभुणे, ह भ प बाळासाहेब काशीद पाटील, ह भ प पंकज महाराज गावडे, ह भ प तुकाराम भाऊ, ह भ प राघव चैतन्य महाराज, ह भ प निवृत्ती महाराज बोरकर शास्त्री, ह भ प शेखर महाराज जांभुळकर, ह भ प धारू मामा, ह भ प बब्रुवाहन महाराज वाघ, मा. महापौर सौ. माई ढोरे, श्री जगन्नाथ नाटक पाटील, सौ. माधवी ताई राजापूरे, सौ उज्वला गावडे, श्री रघुवीर शेलार, श्री अमित भेगडे, श्री सचिन शेलार, ह भ प विजय हुलावळे, मा. नगरसेवक सुरेश भोईर, मा. नगरसेवक सागर अंघोळकर, मा. नगरसेवक राजेंद्र राजापुरे, मा. नगरसेवक शशिकांत कदम, अंबरनाथ कांबळे, सौ राजश्री जाधव, सखाराम रेडेकर, कैलास कातळे,  जनार्धन जगताप, श्री प्रकाश नामदेव काटे, श्री आत्माराम नवले यांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि विणापूजन करण्यात आले.

यावेळी ज्ञानेश्वरी पारायण व्यासपीठ नेतृत्व ह भ प निवृत्ती महाराज बोरकर शास्त्री साथसंगत: भक्ती योग अध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची. ह भ प शिवानंद स्वामी महाराज तसेच श्री विजय अण्णा जगताप, श्री विजय पांडुरंग जगताप, श्री सुभाष दादा काटे, श्री नाना करंजुले, श्री आदेश नवले, श्री अनिल बारणे, प्रकाश दादा काटे, श्री गणेश सोनवणे, श्री सुनील येडे,  संतोष लहाणे,  हनुमंत डुंबरे, उद्धव कवडे, श्री विलास तात्या जगताप, श्री रमेश काशीद, पोपट अण्णा जगताप, संजय मराठे, भाऊसाहेब जाधव, श्री ज्ञानेश्वर खैरे, राजू नागणे, सुनील कोकाटे, प्रवीण पाटील, संदीप दरेकर, उमेश झरेकर, अमित घोडसाळ आदी मान्यवर उपस्थित होते.

पिंपरी चिंचवड शहरातील कासारवाडी येथे श्री दत्तसाई सेवा कुंज आश्रम मंदिरात, दत्त जयंती उत्सव साजरा करण्यात येत आहे. पहाटे काकडारतीपासून सुरुवात होत गुरू चरित्र ग्रंथांचे पारायण, महिला भजनी मंडळाचे भजन, सायंकाळी हरिपाठ, दररोज कीर्तन सेवा अशा धार्मिक व सांप्रदायिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याने पिंपळे गुरव-कासारवाडी परिसरातील वातावरण धार्मिक आणि प्रसन्नतेने भारावून गेले आहे.

श्री दत्त साई सेवा कुंज आश्रम कासारवाडी येथे दत्तजयंती निमित्त माननीय आमदार लक्ष्मणभाऊ जगताप आणि मित्रपरिवार यांच्या वतीने २० डिसेंबर ते दिनांक २७ डिसेंबर
सात दिवसीय कीर्तन महोत्सव आयोजन करण्यात आलेले आहे. पहिल्या दिवसाची कीर्तन सेवा ह. भ. प. पोपट महाराज कासारखेडकर यांच्या मधुर किर्तनाने झाली .

यावेळी महाराजांनी काळ सारावा चिंतनें । एकांतवासीं गंगास्नानें । देवाचें पूजन । प्रदक्षणा तुळसीच्या ॥१॥
युक्त आहार विहार । नेम इंद्रियांसी सार । नसावी बासर । निद्रा बहु भाषण ॥ध्रु.॥

या संत तुकाराम महाराजांच्या अभांगचे निरूपण देत, हरीच्याच चिंतने काळ घालावा.एकांत राहावे,गंगास्नान करावे.देवाची पूजा करून तुळशीप्रदक्षिणा कराव्या.आहारात व्यवहारात नियम असावे.इंद्रियावर संयम असावा,जास्त बडबड नसावी,जास्त झोप हि नासावी.परमार्थ हे महा धन आहे,त्या योगे हरीच्या चरणांची प्राप्ती करून घे.हे सर्व जतन होण्या साठी हे नियम आहेत.तुकाराम महाराज म्हणतात देह हा देवाला समर्पण केला पाहिजे,त्याचा भार स्वतःवर घेऊ नको,म्हणजे अवघा आनंदच तुला होईल. असा भावार्थ सांगितला.

सुंदर अशा भव्य मंडपात प्रभू श्रीराम यांच्या अयोध्या येथे साकारत असलेल्या भव्य मंदिराचा देखावा तसेच माऊली पांडुरंग आणि गोपाळ श्रीकृष्णाच्या मूर्तीने सर्व भाविकांचे लक्ष वेधून घेतले आहे. या सोहळ्याचे मंदिर ट्रस्ट च्या वतीने आयोजन करण्यात आले आहे, या कीर्तन सोहळ्यास पिंपरी चिंचवड परिसरातील नागरिक भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Maharashtra14 News

Recent Posts

अखेर राज्य मंत्रिंमंडळाचे खातेवाटप जाहीर, वाचा कुणाला कोणते मंत्रालय

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२१ डिसेंबर : अखेर राज्य मंत्रिमंडळाचं खाते वाटप जाहीर झालं आहे. हिवाळी…

2 days ago

पुण्यातील चिंतामणी ज्ञानपीठा तर्फे आशा राऊत यांचा तेजस्विनी पुरस्काराने सन्मान

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१७ डिसेंबर : चिंतामणी ज्ञानपीठा तर्फे आशा राऊत यांचा तेजस्विनी पुरस्काराने सन्मान…

5 days ago

अखेर खातेवाटपाचा फॉर्म्युला ठरला! महसूल फडणवीसांकडे, अर्थ खाते अजितदादांकडे, तर ….

महाराष्ट्र व14 न्यूज, दि.१७ डिसेंबर : महाराष्ट्रात सध्या राजकीय घडामोडी वेगाने सुरु आहेत. काही दिवसांपूर्वी…

5 days ago

लाडक्या बहिणींसाठी गुडन्यूज … हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी महायुती सरकारची लाडक्या बहिणींना मोठी ओवाळणी

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१७ डिसेंबर : लाडक्या बहिणींसाठी गुडन्यूज आहे, अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी लाडकी बहीण…

6 days ago

देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रीमंडळात कुणाकुणाचा समावेश

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१५ डिसेंबर :  महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये लोकसभा निकालांच्या उलट निकाल लागल्याचं पाहायला…

1 week ago

शपथ घेतल्यानंतर पहिल्या तासातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली स्वाक्षरी वैद्यकीय मदतीच्या फाईलवर

महाराष्ट्र14 न्यूज, दि.०५ देचेमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पहिल्याच मंत्रिमंडळ…

3 weeks ago