Google Ad
Uncategorized

द न्यु मिलेनियम इंग्लिश मिडियम स्कुल व जूनियर शाळेत क्रीडास्पर्धाचा विद्यार्थ्यांनी घेतला आनंद

महाराष्ट्र 14 न्यूज, (दिनांक – ७ डिसेंबर २०२३.) : देश मजबूत करायचा असेल तर, मुलांचा पाया मजबूत केला पाहिजे. याचेच औचित्य साधून नवी सांगवी येथील “प्रतिभा महिला प्रतिष्ठान संचलित”, द न्यु मिलेनियम इंग्लिश मिडियम स्कुल व जूनियर शाळेत क्रीडास्पर्धा पार पडल्या.

नैतिक, शारीरिक, मानसिक, आणि आरोग्याशी संबंधित, सांघिक व वैयक्तिक स्पर्धेमध्ये क्रॉस कंट्री,धावणे,भालाफेक तर सांघिक स्पर्धेमध्ये फुटबॉल, हॉकी, क्रिकेट सारखे या खेळ घेण्यात आले .या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सिम्बॉयसिस कॉलेजचे प्रा. संजय गायकवाड सर (हॉकी असोसिएशनचे चिटणीस,आदर्श शिक्षक पुरस्कार, स्वाभिमान पुरस्कार) व सदस्य स्वाती पवार मॅडम उपस्थित होत्या .मान्यवरांनी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदनाने झाली.नंतर विविध स्पर्धामध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना २०० ते २५० सुवर्ण, ब्रांझ, सिल्वर पदक देऊन कौतुक सोहळा पार पडला. यामध्ये ब्लू हाऊस ने ५७ मेडल जिंकून ते तिन्ही हाऊस मध्ये विजयी ठरले .

Google Ad

या कार्यक्रमासाठी उपाध्यक्ष विजू अण्णा जगताप ,डॉ.विकास पवार, प्रा. प्रताप बामणे , देवराम पिंजन, विजया मोरे, श्रद्धा पुजारी व इतर पिटीए मेंबर, प्राचार्य इनायत मुजावर मॅडम उपस्थित होते. यासाठी सर्व प्राथमिक व माध्यमिक शिक्षक वृंद यांचे सहकार्य लाभले.स्पर्धेत विद्यार्थ्यांना गुणदान करण्याचे काम कॉलेजच्या प्राचार्या मा. इनायत मुजावर मॅडम व पी टी शिक्षक दत्ता कांबळे व संजय पारटे यांच्या नियंत्रणखाली करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वाती थिगळे व स्वाती येवले यांनी केले. अशाप्रकारे शाळेच्या प्राचार्य मा. इनायत मुजावर मॅडम यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम ने झाली.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!