शहर पोलिओ मुक्त करण्यासाठी कोरोना संबधित सर्व नियमांचे पालन करून पालकांनी आपल्या पाच वर्षाखालील बालकांना नजीकच्या पोलिओ बूथ केंद्रावर नेऊन पोलिओ डोस पाजून घ्यावा, पोलिओ लसीकरणापासून एकही बालक वंचित राहणार नाही याची काळजी प्रत्येकाने घ्यावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
महापालिकेने केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार शहरात लसीकरण मोहिमेचे आयोजन केले आहे. शहरात १०१९ लसीकरण केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे. या केंद्रांमार्फत ८ विभागीय प्रभारी वैद्यकीय अधिकारी आणि ५५ वैद्यकीय अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली २१५ पर्यवेक्षक तसेच ३०४२ लसीकरण कर्मचारी नेमण्यात आले आहेत.
कोरोना विषाणू संक्रमण काळात नागरिकांच्या सहकार्यामुळे आपण कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात ठेवण्यात ब-यापैकी यशस्वी झालो तरी अजून पूर्णपणे कोरोनाचा प्रादुर्भाव संपलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी कोरोना संबधित सर्व नियमांचे पालन करून आपल्या ५ वर्षाच्या आतील बालकांना पल्स पोलिओ लसीकरण करून घेणे गरजेचे असल्याचेही प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. जयश्री शेलार यांनी सांगितले.
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०७ मे ) :- मावळ लोकसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीतील शिवसेना (उद्धव…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०७) : पुणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.सुहास दिवसे यांच्या नियंत्रणाखाली…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. ०७ मे) :आज (०७ मे) ज्येष्ठ नेते शरद पवार आणि काँग्रेसचे…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : क्रिकेट खेळत असताना गुप्तांगावर चेंडू लागल्याने ११ वर्षीय मुलाचा…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : लोकसभा निवडणुकीसाठी येत्या 7 मे रोजी तिसऱ्या टप्प्यातील मतदान…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी भागात गॅस चोरी करून काळ्या…