भाजपच्या चार नवदुर्गाच्या हाती पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची सूत्रे … लोखंडे, म्हेत्रे, गव्हाणे, पवार सभापतीपदी विराजमान!

महाराष्ट्र 14 न्यूज, ( दि . २३ ऑक्टोबर ) : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या विधी , महिला व बाल कल्याण , शहर सुधारणा , कला क्रीडा साहित्य व सांस्कृतिक आणि शिक्षण समिती सभापतीपदी अनुक्रमे स्वीनल कपिल म्हेत्रे , चंदा राजू लोखंडे , प्रा . सोनाली दत्तात्रय गव्हाणे , उत्तम प्रकाश केंदळे आणि मनिषा प्रमोद पवार यांची बिनविरोध निवड झाली . महापालिकेच्या विविध विषय समित्यांच्या मभापती पदासाठी महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनामधील माजी महापौर दिवंगत मधुकर पवळे सभागृहात त्या त्या समितीची विशेष सभा घेण्यात आली .

निवड झाल्यानंतर महिला बालकल्याण समितीच्या नवनिर्वाचित सभापती चंदा लोखंडे म्हणाल्या माझी सभापतीपदी निवड झाली यात आमचे ‘भाऊ’ आमदार ‘लक्ष्मण जगताप’ यांच्यामुळेच मला ही संधी मिळाली असून महिलांसाठी भरीव कार्य करून मी महिलांच्या करीता असणाऱ्या विविध योजनांच्या मार्फत मिळालेल्या संधीचा महिलेच्या कलागुणांना वाव देऊन त्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल.

पुणे विभागीय आयुक्तांचे प्रतिनिधी म्हणून महिला व बालकल्याण विभागाचे आयुक्त डॉ . ऋषिकेश यशोद यांनी या सभांचे पिठासीन अधिकारी म्हणून काम पाहिले . निवडणूकीच्या वेळी अतिरिक्त आयुक्त अजित पवार , उपायुक्त अजय चारठणकर , संदीप खोत , मनोज लोणकर , चंद्रकांत इंदलकर , सहाय्यक आयुक्त सुनिल अलमलेकर , अण्णा बोदडे , शिक्षण मंडळाच्या प्रशासन अधिकारी ज्योत्स्रा शिंदे , समाज विकास अधिकारी संभाजी ऐवले , क्रीडा अधिकारी रज्जाक पानसरे उपस्थित होते . नगरसचिव उल्हास जगताप यांनी सर्व सभांचे कामकाज पाहिले . नवनिर्वाचित विषय समिती सभापतींचे महापौर उषा उर्फ माई ढोरे तसेच सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी अभिनंदन केले .

केवळ भाजपच्याच सर्व उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याने फक्त औपचारिकता बाकी होती , त्यामुळे शुक्रवारी फक्त निवडणूक प्रक्रिया पार पडली व सर्व ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे सभापती निवडून आल्याचे जाहीर झाले.

Maharashtra14 News

Recent Posts

पुणे व पिंपरी-चिंचवड शहर झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी … झोपडपट्टी पुनर्वसनासाठी ५० नवीन प्रस्ताव दाखल

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२३ मे) : झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या सुधारीत नियमावलीतील तरतुदींमुळे झोपडपट्टी पुनर्वसन योजनेला…

4 days ago

मतमोजणी केंद्राच्या १०० मीटर परिसरात मनाई आदेश लागू, तर जिल्ह्या याठिकाणी होणार मतमोजणी

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२३ मे) : जिल्ह्यातील लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय…

4 days ago

आता नागरिकांच्या तक्रारींचा जागेवरच होणार निपटारा … पोलिस आयुक्तांचे आदेश

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२० मे) : नागरिकांशी थेट संवाद साधता यावा, तक्रारदारांची गैरसोय होऊ नये…

6 days ago

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने ५ अनधिकृत जाहिरात फलकांवर निष्कासनाची कारवाई

महाराष्ट्र 24 न्यूज, दि. २० मे २०२४ - पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने शहरातील अनधिकृत जाहिरात…

7 days ago

उद्या दुपारी एक वाजता बारावीचा निकाल जाहीर होणार, विध्यार्थ्यांना आणि पालकांना निकालाची उत्सुकता

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२० मे) : महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक मंडळाच्यावतीनं (MSBSHSE) बारावीच्या परीक्षेच्या निकालाची…

7 days ago

मोशीत वादळी वाऱ्यासह पाऊसामुळे “या” ठिकाणी ; भलं मोठं लोखंडी होर्डिंग कोसळलं

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.1६ मे ) : पिंपरी चिंचवड शहरातील मोशी, डुडळगाव, चऱ्होली परिसरात सोसाट्याच्या…

2 weeks ago