Categories: Editor Choice

२५ वर्षानंतर मिळाला जुन्या मैत्रीला उजाळा … दापोडी येथील जनता शिक्षण संस्थेच्या स्वामी विवेकानंद महाविद्यालयात स्नेहसंमेलन मेळावा उत्साहात संपन्न

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१७ मे) : दापोडी येथील जनता शिक्षण संस्थेच्या स्वामी विवेकानंद कला व वाणिज्य महाविद्यालय प्रशालायतील वाणिज्य शाखेतील १९९७ सालच्या बॅचमधील माजी विद्यार्थी विद्यार्थीनींचा स्नेहसंमेलन मेळावा उत्साहात पार पडला. हा स्नेह मेळावा रौप्य महोत्सव म्हणून साजरा करण्यात आला होता. यावेळी जुन्या आठवणींना मित्र मैत्रिणींकडून उजाळा देण्यात आला.

या स्नेह मेळाव्यात आयुष्यात कमावलेली एकमेव दौलत म्हणजे मैत्री असल्याचे दिसून आले. या मैत्रीचा रविवारी (दि. १५) रौप्य महोत्सव केक कापून साजरा करण्यात आला. प्रमुख उपस्थितीमध्ये विद्यालयाचे माजी प्राचार्य प्रा. किशोर जगताप, प्राचार्य प्रा. सुर्यवंशी होते. या स्नेहमेळाव्याचे आयोजन रवींद्र बाईत व मित्र परिवार यांनी एकत्रित येऊन पुढाकार घेत उत्साहात पार पाडला. ग्रुप मधील नितीन कदम सुनील काची व गिता केळकर यांनी जुन्या व नव्या गीतांचा कार्यक्रम सादर केला .

यावेळी सचिन घटकांबळे, प्रशांत काजळे, मंजुषा खुर्देकर, किशोर शिर्के, गणेश नवजेकर, नंदा सुपेकर, शर्मिला जैन, अभय खटावकर, सचिन लोहार, पोपट पोतले, दत्तात्रय जाधव, धनराज साबळे, दिपाली काकडे, अनिल पिसाळ, योगिता पोफळे, ज्ञानेश्वर गिरंगे, संदीप केदारी, नितीन कदम, मोहम्मद शेख, मनिषा कर्णावट, समीना तांबोळी, सुधिर कोळी, सीमा शिंदे, युवराज घुले, पिंकी मेहता, स्वाती रणसुभे, ज्योती करजगी, सुनिता कुंभार, प्रतिभा चव्हाण, अतुल डांगे, रविंद्र बाईत, संजय नेहुल, कृष्णा विटेकर, लिना गोरे, अनिल घुले, राहुल जाधव, चेतना लुंकड, उल्हास काटे, बाळकृष्ण घुले, मंगेश सावंत, विश्वास पडघमकर, विरेंद्र जवळकर, अजित जाधव, जकिरा अत्तार, संतोष नाईकरे, सुनेत्रा काजरोळकर, अर्चना काजरोळकर, कल्पना निकम, छाया भालेराव, निलेश शाह, सुनिल काची आदींनी या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

Maharashtra14 News

Recent Posts

सावधान : सांगवीत गॅस चोरी करून काळ्या बाजारात चढ्या दराने होतेय विक्री … चोरी करणारा तरुण ताब्यात

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी भागात गॅस चोरी करून काळ्या…

9 hours ago

देवेंद्र फडणवीस यांना पंढरपूरमध्ये कार्यकर्त्यांकडून एक खास भेट … तर, फडणवीसांनी दिला कार्यकर्त्याला सल्ला

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. सत्ताधारी आणि विरोधक शेवटपर्यंत…

9 hours ago

रोहित पवारांचा अजित पवारांवर निशाणा … अजित दादा तुमच्यात जर धाडस असेल तर ….

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०४ मे) : बारामती लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या…

2 days ago

तुमच्या इथे कोणाविरुद्ध कोण? जाणून घ्या, … पहा, महाराष्ट्रातील सर्व 48 मतदारसंघातील उमेदवारांची यादी!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ मे) : महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 47 जागांवरील लढती कशा असतील हे…

4 days ago

अंध दिव्यांग नागरिकांना ब्रेल लिपीतील व्होटर स्लिपचे वाटप

महाराष्ट्र14 न्यूज, (दि.०२ मे) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मा.निवडणूक…

4 days ago

दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप व आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ मे) : दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप…

5 days ago