Google Ad
Uncategorized

17 सप्टेंबर रोजी सायंकाळी निळू फुले नाट्यगृह, पिंपळे गुरव येथे ‘कुर्ला ते वेंगुर्ला” कॉमेडी चित्रपटाचे सिंधुदुर्ग जिल्हा उत्कर्ष मंडळाच्या वतीने मोफत प्रीमिअर शो चे आयोजन

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.16 सप्टेंबर :- वेंगुर्ला आणि एकूण कोकण तसं पहायला गेले तर सुंदरच … आजच्या जमान्यात कोकणचा विषय सुद्धा वेगळा नाही सगळ्या मराठी घरातला हा प्रश्न …. की मुलीच मिळत नाहीत …?? हा नाशिक,जळगाव, सातारा, नागपूर आणि खाली बेळगावतला देखील अतिशय गंभीर बनला आहे… अगदी ज्वलंत…

पण इतका गंभीर प्रश्न देखील कॉमेडीच्या मार्गाने लोकांपर्यंत भिडविता येतो हे नक्कीच शिवधनुष्य आहे.. आणि ते विजय कलमकर या धडाडीच्या कमालीच्या गुणी दिग्दर्शकाने समर्थपणे पेलवलेय, ते ही नक्कीच ‘गोमू तुझ्या घोवाचा नाव काय..’ सारख्या प्रेमळ मालवणी भाषेतल्या गाण्यातून.. वैभव मांगले तर पक्का मालवणी कॉमेडी किंग! असंख्य कोकण प्रेमी वेंगुर्ला बीच वरची ही भावूक प्रेमकथा बघायला आतुर आहोत.. सगळीकडे याच पिक्चरची चर्चा चालू आहे…

Google Ad

फर्स्ट डे फर्स्टचा प्रीमिअर शो आपण आपण पाहावा आणि आपल्या मित्रपरिवार नातेवाईकानाही पाहायला सांगा, कारण म्हण आहे की सोनारानेच कान टोचलेले पाहिजेत, तसा या चित्रपटांमधून खूप चांगला संदेश तरुण पिढीला मिळणार आहे, हे आपल्याला चित्रपटाचा प्रीमिअर शो पाहिल्यावरच समजेल . तर येताय ना ‘कुर्ला टू वेगुर्ला’ कॉमेडी फर्स्ट प्रीमिअर शो पहायला आपल्या जवळच्या नाट्यगृहात  …

यावेळी चित्रपटाचे दिग्दर्शक, ग्लोबल कोकणचे संस्थापक आदरणीय संजयजी यादवराव व इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत, तसेच हा शो काही निवडक लोकांच्या करिताच आहे, हे ही विसरू नका.

Ad3
ad2
ad1
Google Ad

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!