Google Ad
Uncategorized

अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज, दक्षिण पीठ-नाणीजधाम (महाराष्ट्र) यांचा … १५ व १६ ऑगस्ट रोजी पुणे शहरात समस्या मार्गदर्शन व दर्शन सोहळा !

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.११ ऑगस्ट) : पुणे शहरामध्ये अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराजांचा पूर्वनियोजित समस्या मार्गदर्शन व दर्शन सोहळा आयोजित करण्यात आला आहे सदर कार्यक्रम १५ व १६ ऑगस्ट २०२३ रोजी असणार आहे
हा सोहळा महालक्ष्मी लॉन्स ,पुणे नगर रोड , खराडी बायपास जवळ,जुना जकात नाक्या समोर पुणे  या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे.

तरी सदर कार्यक्रमाला संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातून तसेच विविध ठिकाणावरून भाविक भक्तांची गर्दी होणार आहे
मंगळवार दिनांक १५ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी ठीक ०९ वाजता जगद्गुरु श्री संतपिठावर आगमन झाल्या नंतर स्वागत समारंभ होईल तसेच लगेच प्रवचनाला सुरुवात होईल सकाळी ११ नंतर दर्शन व समस्या मार्गदर्शन व साधक दीक्षा संध्याकाळ पर्यंत असणार आहे.

Google Ad

बुधवार दिनांक १६ ऑगस्ट २०२३ रोजी समर्थ सदगुरू काडसिध्देश्र्वर महाराज पुण्यतिथी उत्सव सोहळा सकाळी ०९ वाजल्या पासून सुरू होणार आहे असा दोन दिवसाचा कार्यक्रम संपन्न होत असताना दोन्हीही दिवस भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले आहे भाविकांनी जगद्गुरुश्रींचा अमृतवाणीचा दर्शनाचा व महाप्रसादाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आव्हान जगद्गुरु नरेंद्रचार्यजी महाराज संस्थान उपपीठ पश्चिम महाराष्ट्र पिठाचे व्यवस्थापक श्री सुधांशू दीपक जाधव सरांनी केले आहे.*जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्था लोक उपयोगी उपक्रम*

*1)शैक्षणिक उपक्रम* : गोरगरीब विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण शैक्षणिक साहित्य
*2) वैद्यकीय उपक्रम* : संस्थांच्या वतीने ४२ ॲम्बुलन्स महाराष्ट्रभर मोफत सेवा आणि नाणीज येथे २४ तास हॉस्पिटल सेवा सुरू आहे
*3) कृषी विषयक उपक्रम* :
गोर गरीब शेतकऱ्यांना मोफत बियाणे खाते औषधे शेती अवजारे वाटप केली जातात
*4) आपत्कालीन मदत उपक्रम* : दुष्काळ पडल्यास संस्थांच्या वतीने जनावरांना शेकडो टन चारा पूरविला जातो
5) अंधश्रद्धा निर्मूलन उपक्रम :
अंगारे दोरे धुपारे गंडा यावर विश्वास न ठेवता अध्यात्म विज्ञान व्यवहार यांची सांगड घालून जीवन कसे जगावे हे मार्गदर्शन केले जाते
*6) दुर्बल घटक मदत उपक्रम* :
निराधार महिलांना घरघंटी शिलाई मशीन शेळ्या मेंढ्या दूपत्या गाई म्हशीचे वाटप केले जाते अशा प्रकारे अनेक उपक्रम राबवले जातात अशा प्रकारे सर्व भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान पश्चिम महाराष्ट्र पिठाचे व्यवस्थापक श्री सुधांशु दीपक जाधव सर यांनी केले आहे.

Google Ad

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!