Google Ad
Uncategorized

लोकसभा निवडणुकीनंतर भोसरीत भाजपला धक्का : माजी नगरसेविका प्रियंका बारसे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०९ जून) : लोकसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीने जोरदार मुसंडी मारली. शरद पवार यांचा परफाॅर्मन्सने तर, भाजपला घामच फोडला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या दमदार कामगिरीमुळे पक्षाकडे काहींचा ओढा वाढला आहे. पिंपरी चिंचवड शहरातील भाजपच्या माजी नगरसेविका प्रियंका बारसे यांनी देखील शरद पवार पक्षात प्रवेश केला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पिंपरी-चिंचवडचे प्रवक्ते आणि माजी नगरसेवक विनायक रणसुंभे यांनी अजित पवार गटाची साथ सोडून पुन्हा शरद पवार यांच्याकडे येत तुतारी हातात घेतली.

प्रियंका बारसे यांनी भाजप (BJP) सोडणे हा भोसरीतील पक्षातील दमदार आमदार महेश लांडगे यांना धक्का मानला जात आहे.प्रियंका बारसे या भोसरीमधून पहिल्यांदाच 2017 ला निवडून आल्या होत्या. प्रियंका शिक्षण बीए. बीएड् असून मुख्याध्यापिका आहेत.

Google Ad

भाजपच्या पिंपरी-चिंचवडमधील भ्रष्टाचाराला कंटाळून बारसेंनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याचे इम्रान शेख यांनी सांगितले. त्या लोकसभा निकालाच्या आधीपासून जयंत पाटील यांच्या संपर्कात होत्या. स्थानिक नेतृत्त्वाच्या हुकूमशाही कार्यपद्धतीला कंटाळून तसेच शरद पवारसाहेबांच्या विचाराने प्रेरित होऊन राष्ट्रवादीत प्रवेश करत असल्याचे त्यांनी प्रवेशानंतर मुंबईत सांगितले.

लोकसभा निवडणुकीनंतर पिंपरी-चिंचवडमध्ये महायुतीला हा पहिला धक्का मानला जात आहे. विशेष म्हणजे, आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून बारसे निवडणुकीच्या रिंगणात उतरतील? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

शिरूर लोकसभेत डॉ अमोल कोल्हे यांना मिळालेल्या जनसामान्याचे कौल लक्षात घेत पिंपरी चिंचवड शहरातील लोकप्रतिनिधी यांचा कल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाच्या दिशेने जाण्याचे संकेत आता मिळू लागले आहे.

यशवंतराव चव्हाण सेंटरमधील या पक्ष प्रवेशावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राष्ट्रवादीच्या नवनिर्वाचित खासदार सुप्रिया सुळे, माजी मंत्री आणि आमदार जितेंद्र आव्हाड, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, युवक शहराध्यक्ष इम्रान शेख, कार्याध्यक्ष सागर तापकीर , रजनीकांत गायकवाड, शाहिद शेख,अशरफ शेख,फहिम शेख, मेघराज लोखंडे, समाधान अचलखांब, प्रवीण बारसे तसेच सुहास देशमुख, प्रथमेश बारसे, कान्होपात्रा थोरात, वैशाली पडवळ आधी युवक आणि महिला पदाधिकारी उपस्थित होते.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!