Shirur : कुठे, घडली घटना … दुचाकीवरून आलेल्या मारेकऱ्यांनी भर चौकात तरुणाला घातल्या गोळ्या

महाराष्ट्र 14 न्यूज : शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी हे गाव एका हत्येच्या घटनेनं हादरलं आहे. दुचाकीवरून आलेल्या काही मारेकऱ्यांनी भर चौकात एका तरुणावर गोळीबार केला आहे. या हल्ल्यात 30 वर्षीय तरुण स्वप्निल छगन रणसिंग याचा मृत्य झाला आहे. तर त्याचा मित्र स्वप्निल सुभाष गावडे हाही किरकोळ जखमी झाला आहे. हा हल्ला पूर्ववैमनस्यातून झाला असल्याचं प्रथमदर्शीनी दिसत आहे. ही घटना आज सकाळी साडे बारा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

या हत्येमुळे टाकळी हाजी गावात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. सदर घटना शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी येथील सर्कल कार्यालयासमोर घडली. मोटारसायकलवरून आलेल्या मारेकऱ्यांनी दोघा मित्रांवर गोळीबार केला. यात एका जणांचा मृत्यू झाला असून एक जण किरकोळ जखमी झाला आहे. या घटनेत मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव स्वप्निल छगन रणसिंग असं आहे. तर त्याचा मित्र स्वप्नील सुभाष गावडे यालाही गोळी चाटून गेली आहे. त्यामुळे तोही या हल्ल्यात किरकोळ जखमी झाला आहे. या गोळीबाराच्या घटनेनंतर टाकळी हाजी गावात मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा दाखल झाला आहे.

हा गोळीबार नक्की कोणत्या कारणावरून झाला याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. गोळीबारानंतर दोन्ही जखमी तरुणांना शिरूर येथील चोरे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. येथे उपचार सुरू असताना स्वप्निल रणसिंग याचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे. शिरूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे घटनास्थळी दाखल झाले असून तपासाला वेग आला आहे. या परिसरात असलेल्या सर्व सीसीटीव्ही फुटेजची कसून तपासणी सुरू आहे. तसेच हल्लाच्या वेळी आसपास असलेल्या सर्व प्रत्यक्षदर्शींकडून माहिती घेतली जात आहे. या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नसून पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.

Maharashtra14 News

Recent Posts

मोशीत वादळी वाऱ्यासह पाऊसामुळे “या” ठिकाणी ; भलं मोठं लोखंडी होर्डिंग कोसळलं

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.1६ मे ) : पिंपरी चिंचवड शहरातील मोशी, डुडळगाव, चऱ्होली परिसरात सोसाट्याच्या…

2 days ago

चिंचवड ठरविणार मावळच्या विजयाची गणिते, … ४ जूनला कोणती शिवसेनेचा गाठणार दिल्ली? ?

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ मे) : लोकसभेचे मतदान पार पडल्यानंतर आता मावळ विधानसभा मतदारसंघात मताधिक्य…

4 days ago

नवी सांगवीत या शाळेत झाले बोगस मतदान … तर, मोबाईल बंदी मुळे अनेक मतदार गेले माघारी … पोलिस आणि मतदारांमध्ये हुज्जत

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. १३) मतदान झाले. सकाळी…

5 days ago

भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी मानले मावळ आणि शिरूर च्या मतदारांचे आभार, असे झाली मतदानाची टक्केवारी:

महाराष्ट्र 24 न्यूज, (दि.१३ मे) : आज (दि.१३ मे) पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर आणि पुणे…

5 days ago

नवी सांगवीत मतदानाला शांततेत सुरवात; बा रा घोलप महाविद्यालयात सकाळपासूनच मतदान केंद्रांवर रांगा, कंट्रोल रुमद्वारे प्रशासनाचे लक्ष

wमहाराष्ट्र व14 न्यूज, (दि.१३ मे) : पिंपरी चिंचवड शहरात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी…

6 days ago

अजित पवारांचा निलशे लंके यांना थेट इशारा … अरे, “बेटो तू ज्या शाळेमध्ये शिकतोयस त्या शाळेचा हेडमास्टर अजित पवार आहे”!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगरमध्ये…

1 week ago