Shirur : विहिरीकाठी चपला काढल्या, मोबाईल-पैसे ठेवले … शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे येथे बापाची दोन लेकींसह आत्महत्या

महाराष्ट्र 14 न्यूज : दोन मुलींसह विहिरीत उडी घेऊन पित्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पुण्यात उघडकीस आली आहे. मोबाईल, पैसे विहिरीच्या काठावर काढून ठेवून पित्याने लेकींसह जीवनयात्रा संपवली. मात्र आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे गावात घडलेल्या या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. पिता राजेंद्र भुजबळ यांनी दीक्षा राजेंद्र भुजबळ, ऋतुजा राजेंद्र भुजबळ या दोघी मुलींसह विहिरीत उडी मारुन आयुष्य संपवलं.

तळेगाव ढमढेरे येथील शेणाचा मळा या ठिकाणी उत्तम भुजबळ यांच्या विहिरीच्या कडेला तिघांच्या चपला आढळल्या. मोठ्या माणसाच्या चपलांसोबत लहान मुलींच्या चपला दिसल्या. त्याच्याबरोबर मोबाईल आणि पैसेही पडलेले असल्याचे दिसून आले. त्यावेळी ही घटना उघडकीस आली.

तिहेरी आत्महत्येच्या घटनेने तळेगाव ढमढेरे गावात एकच खळबळ उडाली आहे. भुजबळ बापलेकींच्या सामूहिक आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. शिक्रापूर पोलिसांनी या घटनेची अकस्मात मृत्यू अशी नोंद केली आहे. तर पुढील तपास शिक्रापूर पोलिस करत आहेत.

Maharashtra14 News

Recent Posts

मोशीत वादळी वाऱ्यासह पाऊसामुळे “या” ठिकाणी ; भलं मोठं लोखंडी होर्डिंग कोसळलं

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.1६ मे ) : पिंपरी चिंचवड शहरातील मोशी, डुडळगाव, चऱ्होली परिसरात सोसाट्याच्या…

3 days ago

चिंचवड ठरविणार मावळच्या विजयाची गणिते, … ४ जूनला कोणती शिवसेनेचा गाठणार दिल्ली? ?

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ मे) : लोकसभेचे मतदान पार पडल्यानंतर आता मावळ विधानसभा मतदारसंघात मताधिक्य…

4 days ago

नवी सांगवीत या शाळेत झाले बोगस मतदान … तर, मोबाईल बंदी मुळे अनेक मतदार गेले माघारी … पोलिस आणि मतदारांमध्ये हुज्जत

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. १३) मतदान झाले. सकाळी…

5 days ago

भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी मानले मावळ आणि शिरूर च्या मतदारांचे आभार, असे झाली मतदानाची टक्केवारी:

महाराष्ट्र 24 न्यूज, (दि.१३ मे) : आज (दि.१३ मे) पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर आणि पुणे…

6 days ago

नवी सांगवीत मतदानाला शांततेत सुरवात; बा रा घोलप महाविद्यालयात सकाळपासूनच मतदान केंद्रांवर रांगा, कंट्रोल रुमद्वारे प्रशासनाचे लक्ष

wमहाराष्ट्र व14 न्यूज, (दि.१३ मे) : पिंपरी चिंचवड शहरात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी…

6 days ago

अजित पवारांचा निलशे लंके यांना थेट इशारा … अरे, “बेटो तू ज्या शाळेमध्ये शिकतोयस त्या शाळेचा हेडमास्टर अजित पवार आहे”!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगरमध्ये…

1 week ago