Shirur : रात्रीच्या वेळी डॉक्टरनं महिलेला चेकअपसाठी बोलवलं अन …

महाराष्ट्र 14 न्यूज : शिरूर तालुक्यातील न्हावरे या गावातील डॉक्टरने चक्क आपल्याच दवाखान्यातील रुग्ण महिलेकडे शरीरसुखाची मागणी करत महिलेचा विनयभंग केला असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यानंतर सदर डॉक्टरवर शिरूर पोलीस स्टेशन येथे विनयभंग प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने पुणे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

सदर पिडीत महिला शिक्रापूर (ता. शिरूर ) येथील रहिवाशी असून, आजारी असल्याने तिने काही दिवस शिरूर येथे हॉस्पिटलमध्ये उपचार घेतले मात्र प्रकृतीमध्ये सुधारणा न झाल्याने पिडीतेच्या वडिलांनी सदर महिलेला न्हावरे येथील डॉ. रामहरी लाड यांच्या नाथकृपा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले होते. या हॉस्पिटलमधील डॉ. रामहरी लाड यांनी सदर पीडितेला तपासणी करायची आहे असं म्हणून त्यांच्या केबिनमध्ये बोलावून घेतले. सदर महिलेला गुप्तांगातून तपासणी करायची असल्याचे सांगितले.

यावेळी पीडितेने माझ्या पालकांना सांगा, त्यानंतर पाहू असे म्हटले असता डॉ. लाड यांनी तू कोणालाही काही बोलू नकोस, असं म्हणून तिच्याकडे शरीरसुखाची इच्छा व्यक्त करत महिलेच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. यावेळी महिलेने डॉक्टरांना ढकलून देत घाबरून डॉक्टरांच्या केबिन बाहेर धाव घेतली आणि आपल्या घरच्यांना फोन करून घडलेली सर्व हकीकत सांगितली,

झाल्या प्रकारानंतर पीडितेच्या पालकांनी शिरूर पोलीस स्टेशनात धाव घेतली, घटनेबाबत पोलीसांना माहिती देत याबाबत शिरूर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दिली, पीडित महिलेने शिरूर पोलीस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादीवरून शिरूर पोलिसांनी न्हावरा येथील नाथकृपा हॉस्पिटलचे संचालक डॉ. रामहरी भुजंगराव लाड यांच्याविरुद्ध विनयभंग प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

Maharashtra14 News

Recent Posts

तुमच्या इथे कोणाविरुद्ध कोण? जाणून घ्या, … पहा, महाराष्ट्रातील सर्व 48 मतदारसंघातील उमेदवारांची यादी!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ मे) : महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 47 जागांवरील लढती कशा असतील हे…

2 days ago

अंध दिव्यांग नागरिकांना ब्रेल लिपीतील व्होटर स्लिपचे वाटप

महाराष्ट्र14 न्यूज, (दि.०२ मे) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मा.निवडणूक…

3 days ago

दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप व आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ मे) : दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप…

3 days ago

‘जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली, तर पुन्हा माझ्याकडे पायरी चढायची नाही … नेत्याने दिला कार्यकर्त्याना दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…

6 days ago

महायुतीच्या विजयासाठी भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा शहरात बैठकांचा धडाका पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या १०० हून अधिक नमो संवाद सभा

महाराष्ट्र 24 न्यूज, दि.२५ एप्रिल : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-आरपीआय-मनसे-रासपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंगआप्पा…

1 week ago