Google Ad
Uncategorized

शरदचंद्र पवार यांनी आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांना वाहिली श्रद्धांजली … सांत्वन करत जुन्या आठवणींना उजाळा देत कुटुंबीयांशी साधला संवाद

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ जानेवारी) : चिंचवड विधानसभा
मतदारसंघाचे दिवंगत आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांचे ०३ जानेवारी रोजी निधन झाले. आज शुक्रवारी (दि. ६) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व खासदार शरद पवार यांनी पिंपळे गुरव येथील निवासस्थानी येऊन जगताप कुटुंबियांचे सांत्वन केले. तसेच आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या आठवणींनाही त्यांनी उजाळा दिला.

यावेळी त्यांच्या समवेत साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील, पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष संजोग वाघिरे, राष्ट्रवादी काँग्रेस पिंपरी चिंचवड कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे देखील होते. शरद पवार यांनी लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली, त्यानंतर त्यांनी जगताप कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. तसेच जगताप यांच्या कुटुंबातील सर्वच सदस्यांची आस्थेवाईकपणे चौकशी देखील केली. या दुःखातून सावरण्यासाठी जगताप कुटुंबाला धीर दिला. दिवंगत लक्ष्मणभाऊ यांच्यासोबतच्या काहीजुन्या आठवणींनाही त्यांनी उजाळा दिला.

Google Ad

यावेळी आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप, मुलगी ऐश्वर्या रेणुसे व बंधू शंकर जगताप, विजय जगताप, लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या भगिनी व इतर सर्व नातेवाईक मित्रमंडळी उपस्थित होते.

Google Ad

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!